Site icon

भोयरे गांगर्डा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लोहयुक्त बिस्किटांचे वाटप: आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम

पारनेर / भगवान गायकवाड,
     पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा उपक्रम नुकताच पार पडला. शाळेतील सर्व मुलांना एक महिनाभर पुरेल एवढ्या ब्रिटानिया कंपनीच्या लोहयुक्त बिस्किट बॉक्सचे वाटप करण्यात आले.
       विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक आहार आणि लोहाची कमतरता दूर करण्याच्या उद्देशाने हे वाटप करण्यात आले.हा स्तुत्य उपक्रम स्पर्श ग्राफिक्सचे संचालक बापू भोगाडे, व्हा. चेअरमन प्रशांत रसाळ आणि युवा उद्योजक आदिनाथ भोगाडे यांच्या विशेष प्रयत्नांतून साकारला गेला. या तिघांनी पुढाकार घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पोषणमूल्य असलेल्या बिस्किटांची व्यवस्था केली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणाऱ्या या उपक्रमामुळे शाळा आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.या लोहयुक्त बिस्किट बॉक्स वाटपाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. माजी सरपंच भाऊसाहेब भोगाडे, भाऊसाहेब भोगाडे सर माजी चेअरमन दादासाहेब रसाळ, सेवा सोसायटी संचालक आप्पासाहेब रसाळ विद्यमान उपसरपंच आदिनाथ गायकवाड, व्हा. चेअरमन सुभाष भोगाडे सर, मा. उपसरपंच संजय पवार, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किशोर रसाळ मेजर, सुधीर भोगाडे, विजय कामठे, संतोष केकडे, प्रविण कामठे.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज डोंगरे युवा नेते व उद्योजक वैभव डोंगरे, शेखर रसाळ, युवराज रसाळ, नितीन भोगाडे, संजय भिमाजी पवार. शिक्षक  दरेकर सर,दुधाडे सर, सौ. गायकवाड मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना स्पर्श ग्राफिक्सचे संचालक आणि युवा उद्योजक बापू भोगाडे यांनी शाळेसाठी भविष्यात अधिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ब्रिटानिया कंपनीकडून शाळेसाठी आणखी आर्थिक तसेच वस्तू रुपाने मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक विकासाला हातभार लागणार आहे.
हा उपक्रम केवळ बिस्किटांचे वाटप नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा आणि त्यांना सकस आहार मिळावा यासाठी करण्यात आलेला एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. अशा सामाजिक जाणीवेतून साकारलेल्या उपक्रमांचे समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Advertisement
Share This News On
Exit mobile version