बलुतेदार संघटनेचे नेते बाळासाहेब शिरतार यांची माहिती
पारनेर/प्रतिनिधी :
जय मल्हार क्रांती संघटना पारनेर तालुका व बलुतेदार संघटना पारनेर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने, लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य व तेजस्विनी जनसेवाभावी संस्था अंबड यांच्या संचालनाखाली भव्य लोककलावंत मेळावा, कलगी-तुरा स्पर्धा व पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरही मोफत होणार आहे.
कार्यक्रम सोमवार, ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सावरगाव (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे होईल. लोककलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच कलगी-तुरा स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरण केले जाईल. मोतीबिंदूग्रस्त रुग्णांसाठी शस्त्रक्रिया शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन बलुतेदार संघटनेचे नेते सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिरतार (अहिल्यानगर-पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य) यांनी केले आहे. ते म्हणाले, सांस्कृतिक वारसा जपताना जनसेवा हा उद्देश आहे. सर्वांनी सहभागी व्हावे.
कार्यक्रमात लोककला सादरीकरण, स्पर्धा व पुरस्कार सोहळा आकर्षण ठरणार आहे. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्ण तपासणी करून शस्त्रक्रिया करेल. आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



