साखर कारखानदारी महाराष्ट्र व सहकाराचा आर्थिक कणा – पद्मश्री पोपटराव पवार

माळकुपच्या कृषीनाथ ग्रीन एनर्जी कारखाना बाॅयलर अग्नी प्रदीपन व गव्हाणपुजन


पारनेर / भगवान गायकवाड,


  साखर कारखानदार साखर उत्पादनाबरोबरच इथेलाॅन वीज व सीएनजी उत्पादन निर्मितीकडे वळाले असून यापुढील काळात साखर कारखानदारी महाराष्ट्र व सहकाराचा आर्थिक कणा ठरणार असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले तर माळकुपच्या माळरानावर कृषीनाथ ग्रीन एनर्जी कारखान्माने साडे तीन लाख मेट्रिक उद्दीष्ट ठेवले असुन या पाठीमागे या संचालक मंडळाचे सहकार चळवळ संस्कार असल्याचे गौरवोद्गार पद्मश्री पवार यांनी काढले आहे.


   माळकुप येथील कृषीनाथ ग्रीन एनर्जी कारखाना‌ बाॅयलर अग्नी प्रदीपन गव्हाणपुजन कार्यक्रम मंगळवारी पद्मश्री पोपटराव पवार व श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखानाचे चेअरमन डॉ पांडुरंग अण्णा राऊत प्रदिप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.


  यावेळी कृषीनाथचे अध्यक्ष महेश करपे, कार्याध्यक्ष रविंद्र भुजबळ, उपाध्यक्ष अनिल मोहित, कार्यकारी संचालक प्रकाश मते, डॉ. प्रदिप दाते, संचालक नरेश करपे, सभापती अनिल भुजबळ, माजी सभापती गंगाराम बेलकर, डॉ. पोपट मते, सरपंच लीलाताई रोहकले, राहुरी कारखाना संचालक केशवराव आडसुळ, लहुजी घडले, सरपंच संजय काळे, उपसरपंच राहुल घंगाळे, भारत केळेकर, अनिल मोहिते, संचालिका डॉ. वंदना पोपटराव मते, सौ. कविता बनकर, भाऊसाहेब आव्हाळे, सचिन पारखे, जयदीप जोशी, नितीन गडदे, बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय पवार यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी व सभासद उपस्थित होते.


    यावेळी पवार म्हणाले की, पारनेर सारख्या दुष्काळी भागात माळकुपच्या माळरानावर हे धाडस करत शेतकरी व सभासद हित जोपासले आहे दुष्काळी भागात पाण्याची समस्या जाणवत नाही साखर व गाळप वाढेल तितकेच सभासद जोपासले जात आहे.
केंद्र सरकारने इथेलाॅन निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले असून वाहनांचा धुर निघाला तरी चालेल परंतु शेतकरांची प्रपंचाचा धुर निघता कामा नये त्यामुळे शेतकरी व सभासदाहितात राष्ट्र हित आहे. तर या नावीन्यपूर्ण बदलामुळे शेतकरांची दिवाळी गोड होण्यासाठी प्रयत्न करावे व इथेलाॅन निर्मितीला प्राधान्य द्यावे असे आवाहन पवार यांनी केले.


कृषीनाथचे उपाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले की, तिसरा गाळप हंगाम सुरू करत आहोत २ लाख मेट्रिक टन ५५ लाख इथैलाॅन गाळप काम करत आहोत. माळरानावर साखर कारखाना चळवळ उभी राहिली. राहुरी पारनेर व नगर नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरांनी जो विश्वास टाकला त्यामुळे याभागचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. तर लवकरच सीएनजी निर्मिती प्रकल्प लवकरच सुरू करण्याचे आश्वासन संचालक गंगाराम बेलकर यांनी दिले आहे. तर यापुढे हार्वेस्टरच्या माध्यमातून ऊसतोड केली जाणार आहे.

कृषी नाथ ग्रीनएनर्जी साखर कारखानाचा बाॅयलर अग्नी प्रदीपन व गव्हाणपुजन प्रसंगी उसाळी मोळी टाकताना पद्मश्री पोपटराव पवार डॉ पांडुरंग अण्णा राऊत प्रदिप नाईक महेश करपे रविंद्र भुजबळ  अनिल मोहि प्रकाश मते डॉ प्रदिप दाते संचालक नरेश करपे सभापती अनिल भुजबळ माजी सभापती गंगाराम बेलकर.

साडेतीन लाख मेट्रिक टनाचे उद्दीष्ट..
  कृषीनाथ ग्रीन एनर्जीने साडेतीन लाख मेट्रिक टनाचे उद्दीष्ट ठेवले आहे १ नोव्हेंबर पासून हा गळीत हंगाम चालू होणार आहे तर जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यां बरोबर भाव देण्याचा प्रयत्न केला आहे.तर साखर इथैलाॅन बरोबर वीजनिर्मिती प्रकल्प यावर्षी कार्यान्वित होणार आहे.अडिच हजार टन उस गाळप ६० हजार लीटर इथेलाॅन निर्मिती व ६ मेगावॅट वीजनिर्मिती या प्रकल्पात होणार आहे.
– महेश करपे व प्रकाश मते, 
अध्यक्ष व कार्यकारी अधिकारी

Advertisement
Share This News On
Exit mobile version