निघोज जिल्हा परिषद गटातून मंगेश कारखिले इच्छुक; भेटी गाठी व संपर्क सुरू केल्याने मंगेश कारखिले यांचे पारडे जड
पारनेर / प्रतिनिधी, पारनेर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या निघोज जिल्हा परिषद गटातून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत करत असलेले राळेगण थेरपाळ चे युवा नेते मंगेश कारखिले हे इच्छुक आहेत . त्यांनी भेटी गाठी सुरू केल्याने या निवडणूकीत मोठी रंगत आली असून मोठी चुरस निर्माण झाली आहे. निघोज…
इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल, पारनेरचा १००% निकालाचा वारसा कायम; ग्रामीण विद्यार्थिनींना सक्षम करण्याचा मार्ग यशस्वी!
पारनेर / भगवान गायकवाड, आनंद मेडिकल अँड एज्युकेशनल फाउंडेशन, पारनेर संचलित इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल (ANM/GNM) ने यावर्षीही आपला १००% निकालाचा दैदीप्यमान वारसा कायम राखत, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना यशाची नवी कमान गाठण्यास मदत केली आहे. महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या ANM व GNM अंतिम परीक्षांचे…
पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक स्वबळावर लढविणार – पातारे
पारनेर / भगवान गायकवाड, आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी पारनेर तालुक्यात स्वबळावर लढविणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे यांनी केली आहे. या निर्णयामुळे पारनेर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रे ची भूमिका घेतल्याचे…
“शिक्षक घडवतो व्यक्तिमत्व, विद्यार्थी घडवतो इतिहास : शिक्षणाधिकारी धामणे सर
१९९२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय स्नेह मेळावा संपन्न. पारनेर / भगवान गायकवाड, चांगले शिक्षक हे नशिबाने मिळतात.चांगले विद्यार्थी भेटायला सुद्धा नशीब लागते.विद्यार्थ्यांना घडवणे म्हणजे एका रोपट्याचे जतन करून त्यांचे वृक्षात रूपांतर करण्यासारखं आहे.त्या रोपट्याला खतपाणी देताना काही वेळा ताण द्यावा लागतो.जेणे करून त्यांची मूळ घट्ट होते.विद्यार्थांना दिली जाणारी शिक्षा त्यांना सक्षम करण्यासाठी असते.शिक्षक घडवतो…
पारनेर पंचायत समिती निवडणूक जवळा गणातून सौ.नंदाताई गणेश सावंत यांच्या नावाची चर्चा
पारनेर / भगवान गायकवाड, आगामी पारनेर तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जवळा गणातून सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश सावंत यांच्या पत्नी सौ. नंदाताई गणेश सावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. • पक्षनिष्ठेमुळे उमेदवारीची मागणी –गणेश सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्राहक…
पारनेरमध्ये राजकीय भूकंप! सुजित झावरे पाटील हाती घेणार धनुष्यबाण
सुजित झावरे पाटील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार पारनेर / प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सुजित झावरे पाटील यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, हा भव्य सोहळा ६ नोव्हेंबर रोजी पारनेर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून, त्यांच्या…
चोंभूत गौतमनगर येथे साकारणार चैत्यभूमीच्या कमानीची भव्य प्रतिकृती
चोंभूत गौतमनगर येथील भव्य स्वागत कमानीसाठी रु. २० लाख मंजूरग्रा. सदस्य प्रणल भालेराव यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळत असून, मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत” तब्बल दोन कोटी रुपयांचा…
सर्वसामान्यांना कधी ही वाऱ्यावर सोडणार नाही, प्रसंगी राजकारण सोडू – सचिन वराळ पाटील
निघोज / सौ.निलम खोसे पाटील, संदीप पाटील वराळ यांनी गेल्या ११ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या गरीबांची दिवाळी हा उपक्रम सातत्याने सुरूच ठेऊ. या उपक्रमातून सर्वसामान्य लोकांची दिपावली गोड होते. यांना आम्ही कधी ही वाऱ्यावर सोडणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही राजक सोडू, पण हा उपक्रम बंद होऊ देणार नाही अशी ग्वाही संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊन्डेशन चे…
नांदूर पठार येथे भाऊबीजेचा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न
नांदूर पठार / प्रतिनिधी, नांदूर पठार येथे सोनियाताई रविंद्रशेठ राजदेव यांच्या संकल्पनेतून आणि रविंद्रशेठ राजदेव मित्र मंडळाच्या वतीने भाऊबीजेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील माता-भगिनींनी भरघोस प्रतिसाद देत उत्साहात सहभाग घेतला. भाऊबीजेच्या निमित्ताने बंधू-भगिनींच्या प्रेमळ नात्याचा उत्सव साजरा करताना उपस्थित महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नांदूर…
अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचा ओझर येथे निवासी अभ्यासवर्ग
जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी (सर ) यांची अधिकृत माहिती. पारनेर / भगवान गायकवाड, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांताचा महत्त्वपूर्ण निवासी अभ्यास वर्ग श्री क्षेत्र विघ्नेश्वर देवस्थान, ओझर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे शनिवार दि. २५ आणि रविवार दि. २६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी (सर) यांनी या…




