प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया पारनेर तालुका यांचा सामाजिक उपक्रम
पारनेर / भगवान गायकवाड,
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्र व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पारनेर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय पानोली येथे ” नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत विद्यार्थ्यां कडून मुल्य शिक्षण व व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी या सामाजिक जनजागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रमजान शेख (सर) होते तर प्रमुख उपस्थितीत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे समन्वयक साधना दिदी, साधक राम भाई, विद्यालयाचे शिक्षक रामदास चौरे,( सर), संभाजी थोरात (सर), लोंढे संगीता, गायकवाड भारती आणि दैनिक जनप्रवास वृत्तपत्राचे पत्रकार भगवानराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रारंभी प्रास्ताविक विद्यालयाचे शिक्षक रामदास चौरे सर यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांना अध्यात्माचे मार्गदर्शन करताना ब्रह्माकुमारी साधना दिदी म्हणाल्या की, वर्तमान स्थितीत काळजी गरज आहे ती म्हणजे मानवी जीवन सुंदर व श्रेष्ठ बनवण्यासाठी जीवनात व्यवहारात दिव्यता, मधुरता, आणण्यासाठी ज्या देव देवतांची आपण स्तुती करतो, महिमा गातो पण तसे आपण कधी बनण्याचा मनात विचार केला का? दरवर्षी प्रमाणे आपण गणरायाची पूजा करताना दुर्वा वाहिल्या जातात. वास्तविक आध्यात्मिक दृष्ट्या एक दुर्वा तीन एकत्र रूपात वाहिली जाते. तिचा अर्थ असा आहे की, प्रत्येकात मन, बुद्धी, संस्कार या तीन शक्ती सर्वांमध्ये आहेत. मन चांगले विचार करते तसेच वाईट पण विचार करते आणि जे नाही करायचे त्याचा पण जास्त विचार करते. पण यावर राजयोग मेडिटेशन केल्याने मनातले विचार शांत व स्थिर होतात. व आपली कार्य करण्याची क्षमता वाढते. विचारांची गती स्थिर झाली तर आपोआप निर्णय शक्ती व स्मरण शक्तीची वाढ होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास चौरे (सर,) यांनी केले तर आभार ईश्वरीय परिवाराने मानले.