Headlines

पारनेरमध्ये राजकीय भूकंप! सुजित झावरे पाटील हाती घेणार धनुष्यबाण

सुजित झावरे पाटील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार

पारनेर / प्रतिनिधी,

पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सुजित झावरे पाटील यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, हा भव्य सोहळा ६ नोव्हेंबर रोजी पारनेर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीत झावरे पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुजित झावरे पाटील हे पारनेर तालुक्यातील एक प्रभावी मात्तबर नेते आहेत. त्यांचा तरुणांमधील जनसंपर्क आणि सामाजिक कार्यामुळे त्यांना मोठा पाठिंबा आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना (शिंदे गट) ला तालुक्यात बळ मिळण्याची अपेक्षा आहे. हा प्रवेश स्थानिक पातळीवरील राजकीय गणिते बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विशेषतः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

या सोहळ्याच्या तयारीसाठी शिवसेना (शिंदे गट) ने जोरदार तयारी सुरू केली आहे. पारनेर येथील कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी झावरे पाटील यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थकही पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या प्रवेशामुळे पारनेर तालुक्यातील राजकीय शक्तीप्रदर्शनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत येथील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित असेल. सुजित झावरे पाटील यांच्या या निर्णयामुळे शिवसेना (शिंदे गट) ला तालुक्यात नवी ताकद मिळेल, असा विश्वास पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *