Headlines

पारनेर पंचायत समिती निवडणूक जवळा गणातून सौ.नंदाताई गणेश सावंत यांच्या नावाची चर्चा

पारनेर / भगवान गायकवाड,

    आगामी पारनेर तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जवळा गणातून सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश सावंत यांच्या पत्नी सौ. नंदाताई गणेश सावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

• पक्षनिष्ठेमुळे उमेदवारीची मागणी –
गणेश सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्राहक संरक्षण समितीचे अहिल्यानगर  जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते समाजाकार्यात पूर्ण वेळ सक्रिय असून, खासदार मा. डॉ. निलेश लंके यांचे विश्वासू निकटवर्तीय मानले जातात. पक्ष फुटीनंतर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि खासदार  मा. डॉ. निलेश लंके यांच्यासोबत निष्ठावंत म्हणून कार्यरत आहेत. याच कामाची दखल घेऊन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी त्यांनी जवळा पंचायत समिती गणातून आपल्या पत्नी सौ. नंदा सावंत यांच्या उमेदवारीची मागणी खासदार मा. डॉ. निलेश लंके यांच्याकडे केली आहे.

• गणेश सावंत यांचे सामाजिक कार्य –
गणेश सावंत यांचा सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग असून त्यांनी मोफत नेत्र बिंदू शस्त्रक्रिया शिबिर, कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना मोफत औषधे वाटप, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला आहे. अतिवृष्टीचे पंचनामे, भरपाई विविध विकासकामांसाठी ते शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आले आहेत.


पक्षनिष्ठ आणि समाजकार्याची पार्श्वभूमी असलेल्या गणेश सावंत यांच्या पत्नी सौ.नंदाताई सावंत यांना उमेदवारी दिल्यास, पक्षाला या गणात चांगला फायदा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *