
पतसंस्था पिडीत कर्जदार, जामीनदारांचा पारनेरला मेळावा….!
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील पतसंस्थांच्या कर्जामुळे पिडीत असलेल्या कर्जदार व जामीनदारांचा मेळावा पारनेर येथे संपन्न झाला. या मेळाव्याचे आयोजन लोकजागृती सामाजिक संस्थेने केले होते. पारनेर तालुक्यात पतसंस्थांच्या मनमानी व बेकायदा कर्ज वसुली प्रकरणी अनेक कर्जदार,जामीनदारांनी लोक जागृती सामाजिक संस्थेकडे तक्रारी केल्या होत्या, पतसंस्था, फेडरेशन, वसुली अधिकारी, महसुल अधिकारी आणि सहकार खात्याचे अधिकारी यांनी…