Headlines

पारनेरमध्ये राजकीय भूकंप! सुजित झावरे पाटील हाती घेणार धनुष्यबाण

सुजित झावरे पाटील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार पारनेर / प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सुजित झावरे पाटील यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, हा भव्य सोहळा ६ नोव्हेंबर रोजी पारनेर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून, त्यांच्या…

Read More

घरेलू कामगार महिलांच्या सशक्तीकरणाचा नवा अध्याय — स्नेहालयच्या ‘उमेद प्रकल्पा’तर्फे आय-कार्ड व साडी वाटप सोहळा उत्साहात साजरा

पारनेर / भगवान गायकवाड, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने सातत्याने कार्यरत असलेल्या स्नेहालय संस्थेच्या ‘उमेद प्रकल्पा’तर्फे घरेलू कामगार महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. रहमत सुलतान फाउंडेशन, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांना महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्र (आय-कार्ड) आणि दिवाळीनिमित्त ‘माहेरची साडी’ देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे सेवावस्तीतील १०८ एकल,…

Read More

अत्याचारग्रस्त महिलांना त्वरित न्याय मिळावा: न्या. सोनवणे

माहेरची साडी: प्रेमाची ऊब आणि जगण्याची आशा पारनेर / भगवान गायकवाड, देशातील न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता अत्याचारग्रस्त महिलांना त्वरित न्याय देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायमूर्ती कृष्णाजी सोनवणे यांनी केले.तर, दिवाळीतील भाऊबीजेनिमित्त वंचित महिलांना अनामिक भावांकडून दिली जाणारी ‘माहेरची साडी’ प्रेमाची ऊब आणि…

Read More

साखर कारखानदारी महाराष्ट्र व सहकाराचा आर्थिक कणा – पद्मश्री पोपटराव पवार

माळकुपच्या कृषीनाथ ग्रीन एनर्जी कारखाना बाॅयलर अग्नी प्रदीपन व गव्हाणपुजन पारनेर / भगवान गायकवाड,   साखर कारखानदार साखर उत्पादनाबरोबरच इथेलाॅन वीज व सीएनजी उत्पादन निर्मितीकडे वळाले असून यापुढील काळात साखर कारखानदारी महाराष्ट्र व सहकाराचा आर्थिक कणा ठरणार असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले तर माळकुपच्या माळरानावर कृषीनाथ ग्रीन एनर्जी कारखान्माने साडे तीन लाख मेट्रिक उद्दीष्ट ठेवले…

Read More

पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर; इच्छुक उमेदवारांनी कसली कंबर

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. या सोडतीनुसार, विविध गट आणि गणांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित झाले आहे. जिल्हा परिषद गटांमध्ये जवळा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष), सुपा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), टाकळी ढोकेश्वर गट सर्वसाधारण (महिला), ढवळपुरी गट सर्वसाधारण (महिला) आणि निघोज…

Read More

‘हॉटेल राजदरबार’चे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन!

पारनेर, /प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील माळकूप गावात नगर–कल्याण महामार्गालगत नव्याने उभ्या राहिलेल्या “हॉटेल राजदरबार” या भव्य हॉटेल व्यवसायाचे उद्घाटन पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार श्री. काशिनाथ दाते यांच्या शुभहस्ते थाटामाटात संपन्न झाले. या सोहळ्याने माळकूप गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आमदार काशिनाथ दाते यांनी हॉटेलचे मालक व माळकूपचे आदर्श सरपंच संजय काळे यांचे अभिनंदन करताना सांगितले, “हॉटेल राजदरबार…

Read More

भाऊबीज निमित्त स्नेहालय संस्थेकडून ‘माहेरची साडी’साठी मदतीचे आवाहन

पारनेर / भगवान गायकवाड, मागील दोन दशकांच्या यशस्वी परंपरेनुसार यंदाही अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेने वंचित भगिनींसाठी दिवाळीच्या मंगलमय पर्वात ‘माहेरची साडी’ या हृदयस्पर्शी उपक्रमाचे आयोजन केले आहे. दिवाळीच्या सणासुदीला आपल्या आप्तस्वकीयांना भेटवस्तू, फराळाचे पदार्थ आणि मिठाई देण्याची आपली संस्कृती आहे. ज्या माता-भगिनींना भाऊ आणि माहेरचा आधार असतो, त्यांच्यासाठी दिवाळीतील भाऊबीजेचा दिवस अतिशय खास आणि महत्त्वाचा…

Read More

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक : प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती, सूचना लेखी सादर करण्याचे आवाहन  अहिल्यानगर, जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी  १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारुप मतदार यादी तयार करण्यात येऊन ती ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत संबंधित तहसील कार्यालयात लेखी सादर…

Read More

“केमियाड परीक्षेत श्री ढोकेश्वर कॉलेजच्या विद्यार्थिनींना यश”

टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज टाकळी ढोकेश्वर येथील प्रथम वर्ष विज्ञान या वर्गातील रसायनशास्त्र या विषयाच्या केमियाड या परीक्षेत यश संपादन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दरवर्षी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टी विकसित व्हावी तसेच रसायनशास्त्र विषयात विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून केमियाड या परीक्षेचे आयोजन करत असते….

Read More

भाषा माणसांना जोडण्याचे काम करते. : डॉ. ॠचा शर्मा

टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर. मध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुखातिथी म्हणून डॉ. ॠचा शर्मा यांनी भाषा ही माणसांना जोडण्याचे काम करत असून ते संवादाचे एक उत्तम साधन आहे.  हिंदी ही राष्ट्रभाषा असून भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत या भाषेने महत्त्वाची भूमिका बजावली. आपण…

Read More