टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी,
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज टाकळी ढोकेश्वर येथील प्रथम वर्ष विज्ञान या वर्गातील रसायनशास्त्र या विषयाच्या केमियाड या परीक्षेत यश संपादन केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दरवर्षी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टी विकसित व्हावी तसेच रसायनशास्त्र विषयात विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून केमियाड या परीक्षेचे आयोजन करत असते.
या परीक्षेत महाविद्यालयातील कु. जाधव रिया दत्तात्रय व कु. कोकाटे वैष्णवी श्रीकृष्णा या विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर यांच्या हस्ते विद्यार्थि व पालक यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक नामदेव वाल्हेकर यांनी परीक्षेचे स्वरूप व महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष श्री.रामचंद्रजी दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव अॅड.विश्वासराव आठरे पाटील , सहसचिव मुकेशदादा मुळे, खजिनदार अॅड. दिपलक्ष्मी म्हसे, ज्येष्ठ विश्वस्त सितारामजी खिलारी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ. भाऊसाहेब खिलारी, तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर, उपप्राचार्य प्रा.वीरेंद्र धनशेट्टी व सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



