टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी,
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर. मध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुखातिथी म्हणून डॉ. ॠचा शर्मा यांनी भाषा ही माणसांना जोडण्याचे काम करत असून ते संवादाचे एक उत्तम साधन आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा असून भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत या भाषेने महत्त्वाची भूमिका बजावली. आपण कोणत्याही भाषेचा द्वेष न करता बहुभाषिक बनून त्या त्या भाषेतील साहित्य आत्मसात केले पाहिजे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की हिंदी भाषा आणि साहित्य ही समृद्ध असून व्यक्तिमत्व सर्वगुण संपन्न बनवते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषा साहित्य वाचन करून ज्ञान संपन्न बनावे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विरेंद्र धनशेट्टी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ.एकनाथ जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. रेश्मा सोनवणे यांनी केली.



