Headlines

‘हॉटेल राजदरबार’चे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन!

पारनेर, /प्रतिनिधी,

पारनेर तालुक्यातील माळकूप गावात नगर–कल्याण महामार्गालगत नव्याने उभ्या राहिलेल्या “हॉटेल राजदरबार” या भव्य हॉटेल व्यवसायाचे उद्घाटन पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार श्री. काशिनाथ दाते यांच्या शुभहस्ते थाटामाटात संपन्न झाले. या सोहळ्याने माळकूप गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

आमदार काशिनाथ दाते यांनी हॉटेलचे मालक व माळकूपचे आदर्श सरपंच संजय काळे यांचे अभिनंदन करताना सांगितले, “हॉटेल राजदरबार हे तुमच्या स्वप्नांचा आणि मेहनतीचा दैदिप्यमान पुरावा आहे. आत्मविश्वास आणि जिद्द यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते. तुमच्या या नव्या प्रवासाला प्रचंड यश आणि समृद्धी लाभो!”



या सोहळ्यात संजय काळे यांनी आमदार काशिनाथ दाते आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस सुभाषराव दुधाडे यांचा शाल, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात हॉटेल राजदरबारच्या नव्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. माळकूप गावातील हा नवा व्यवसाय उपक्रम परिसरासाठी एक नवा आर्थिक आणि सामाजिक टप्पा ठरणार आहे, यात शंका नाही.

या प्रसंगी मंजाबापू शिंदे, प्रगतशील शेतकरी अशोक शिंदे, मधुकर शिंदे, व्हा. चेअरमन शरद नाबगे, आबा काळे, श्रीकांत काळे, संदीप काळे, पोपट खांडके, बाळासाहेब गवळी, पत्रकार शिवशंकर शिंदे, सुधीर गवळी, ज्ञानदेव शिंदे, सुनील काळे यांच्यासह गावातील ग्रामस्थ, युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *