पारनेर / भगवान गायकवाड,
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पारनेर केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी साधना दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाधारींचा नुकताच राजस्थान मधील माउंट आबू येथील संस्थेच्या मुख्यालयात वैश्विक शिखर समिट २०२५ मध्ये पारनेर येथील सेवाधारींनी एकता आणि विश्वास आदर्श भविष्यासाठी प्रेरणा या विषयासाठी सात दिवसीय अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केला.राजयोग ध्यानधारणा, आध्यात्मिक ज्ञान आणि स्व-परिवर्तनाच्या गहन अभ्यासासाठी वैश्विक शिखर समिट २०२५ विशेष दौरा आयोजित करण्यात आला होता.
ज्यामुळे सहभागींमध्ये एक नवी ऊर्जा आणि उत्साह संचारला आहे.
माउंट आबू हे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे जागतिक मुख्यालय आहे आणि आध्यात्मिक ज्ञान व राजयोग शिकण्याचे ते प्रमुख केंद्र आहे. या ठिकाणी जगभरातून लाखो लोक आंतरिक शांती आणि जीवनमूल्यांचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. पारनेर केंद्रातील सेवाधारींना याच पावन भूमीवर राजयोग ध्यानधारणेचे सखोल प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली.
या सात दिवसीय अभ्यास दौऱ्यात सेवाधारींनी सकाळी लवकर उठून ‘अमृतवेला’ ध्यानधारणा केली. यामध्ये त्यांना मन एकाग्र करण्याच्या आणि आत्मिक शक्ती वाढवण्याच्या विविध पद्धती शिकवण्यात आल्या. मुख्यालयातील वरिष्ठ राजयोगिनीं शिवानी दिदी, मोहिनी दिदी, उषा दिदी , गीता दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज ज्ञान-वर्गांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात जीवन, ईश्वर आणि कर्मसिद्धांतावर आधारित गहन आध्यात्मिक विषयांवर चर्चा झाली.
या दौऱ्याचा उद्देश सेवाधारींना राजयोग आणि आध्यात्मिक शिक्षणाने परिपूर्ण करून त्यांना अधिक शक्तिशाली बनवणे हा होता, जेणेकरून ते पारनेर आणि परिसरातील लोकांना शांतता व आनंदाचा संदेश अधिक प्रभावीपणे देऊ शकतील. ध्यानधारणेच्या माध्यमातून आत्मिक शांतीचा अनुभव घेणे, तणावमुक्त जीवन जगण्याचे रहस्य समजून घेणे आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करणे यावर विशेष भर देण्यात आला.
माउंट आबू येथील ‘ज्ञान सरोवर’ आणि ‘शांतिवन’ यासारख्या पवित्र स्थळांना भेट देऊन सेवाधारींनी तेथील शांत आणि सकारात्मक वातावरणाचा अनुभव घेतला. या केंद्रांची शिस्त, स्वच्छता आणि सेवाभाव पाहून सर्वजण भारावून गेले. परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि अध्यात्माचे वातावरण यामुळे सहभागी सेवाधारींना एक अविस्मरणीय अनुभव मिळाला.
दौऱ्याच्या समारोपप्रसंगी, सहभागी सेवाधारींनी आपले अनुभव व्यक्त केले. माउंट आबूच्या अनुभवाने त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली असून, आता ते अधिक सेवाभाव, उत्साह आणि आंतरिक शक्तीसह पारनेर केंद्रावर सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. हा अभ्यास दौरा पारनेर केंद्राच्या सेवाकार्याला अधिक बळ देणारा ठरेल, या अभ्यास दौऱ्यासाठी पारनेर केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी साधना दिदी, दिलीप थोरे, बलभीम वाळुंज, वसंत पवार, अरविंद ढोले, अरविंद पळसे, रोहिणी थोरे, विजया वाळुंज, सुनीता पवार, सुरेखा ढोले आदींनी प्रशिक्षण पूर्ण केले.
एफ एम चॅनेल १०७ वर पारनेर मधील सेवाधारीची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
एकता आणि विश्वास भविष्यासाठी नवीन प्रेरणा या विषयी अनुभव सांगताना सेवाधारी म्हणाले की, मनुष्य जीवनातील रोजच्या जीवनात राजयोग ध्यानधारणेचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे. या अभ्यासाने आपले आचार आणि विचार सकारात्मकतेने बदलतील. आत्मिक शक्ती आणि सकारात्मक विचारधारेमुळे पुन्हा एकदा स्वर्णीम भारताची संकल्पना साकार स्वरूपात येईल. असे मत अनेकांनी व्यक्त केले.



