पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर शहरातील संभाजीनगर परिसरात पारनेर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून डासांची उत्पत्ती असलेल्या साचवलेल्या पाण्याच्या टाक्या, कुंड्या, टायर, परिसरातील गवत आदींचा सर्वे करण्यात येत आहे.आणि नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवाहन पारनेर पंचायत समितीचे आरोग्य निरीक्षक आदित्य बंगळे यांनी केले आहे.त्यांच्या समवेत आरोग्य सेवक भगवान चाटे आणि आशा सेविका जयश्री औटी या मदतनीस म्हणून काम पाहत आहे.

सध्या सकाळी गार, दुपारी गरम आणि ढगाळ या सारखे आरोग्यास हानिकारक रोगाट वातावरण तयार झाले असून त्यात डासांच्या प्रादुर्भावाची भर पडली आहे. त्या मुळे सर्दी, ताप आणि खोकला या सारख्या साथींच्या आजारांनी डोके वर काढल्याने दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात विशेष करून लहान मुले व वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे वैद्यकीय तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पावसाळ्यातील बदलत्या वातावरण मुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, वायरल फिव्हर, टायफॉइड या सारख्या साथीच्या आजाराचे प्रमाण अधिक असते. सध्या सकाळी गार आणि दुपारी गरम आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण अशा या रोगट वातावरणामुळे सर्दी खोकला ताप आजाराने रुग्ण दिसून येतात. आताचे विषम वातावरण वेगवेगळ्या विषाणू साठी पोषक असल्याने सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढतात तर दुसरीकडे ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारे, सांडपाण्याची डबकी तसेच घरच्या परिसरात वाढलेले गवतामुळे डासांची उत्पत्तीत मोठी भर पडली आहे. त्या मुळे साथीच्या विविध आजाराने डोके वर काढले आहे. पावसाळ्याच्या दिवसात विषाणुजन्य संसर्गाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. त्या मुळे सर्दी, खोकला, ताप किंवा इतर लक्षणे आढळ्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ञ सांगतात.