कोपरगाव अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकारणी जाहीर
पारनेर / भगवान गायकवाड,
आखिल भारतीय ग्राहक पंचायत हि लोकचळवळ करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांनी केले ते कोपरगाव येथे आयोजित कार्यकारणी बैठक प्रसंगी बोलत होते.यावेळी कोपरगाव येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतची कार्यकारणी निवड जाहीर करण्यात आली.आखिल भारतीय ग्राहक पंचायत कोपरगाव तालुकाध्यक्षपदी सतिश वामन नेने तर सचिव पदी सुजित शरद निलक यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली.
कार्यकारणी बैठक प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष शाहुराव औटी म्हणाले की,अखिल भारतीय ग्राहक पंचायत हि लोकचळवळ करावी.रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महाराजांनी आम्हला गनिमी कावा कसा करावा व शत्रूवर कसे तुटून पडावे हे आम्हास शिकविले. वेळप्रसंगी तलवारीचा वापर करायचा व योग्य वेळी तह करायचा हि नीती आम्ही शिवरायांकडून स्वीकारली पाहिजे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून माणसामध्ये बदल घडतो. हा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकास हक्क आणि अधिकार मिळालेले आहेत. या अधिकारात लेखणीला फार महत्व आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुद्द्याची लढाई गुद्दावर न आणता लेखणीच्या माध्यमातून संयमाने सोडवावी. देशामध्ये कोणतीही तोडफोड न करता संयमाने न्याय मिळवून देणारी ग्राहक पंचायत हि एकमेव संस्था आहे. संयमाने कार्य केल्यानेच संघटना आपल्याबरोबर राहील.
यावेळी कोपरगाव तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकारणी जाहीर करण्यात आली ती पुढीलप्रमाणे अध्यक्ष सतिश वामन नेने, उपाध्यक्ष श्री राजेंद्र शिवाजीराव परजणे, उपाध्यक्ष प्रदीप राजेंद्र भानगुडे, सचिव सुजित शरद निलक, सह सचिव मयुर गोविंद गायके, सह सचिव उदय राजकुमार बारहाते, कोषाध्यक्ष प्रसाद आनंद परजणे, सह संघटक प्रणव सुधाकर कुऱ्हाडे,तालुका कार्यकारणी सदस्य शुभम अशोक वायखंडे, भास्कर राव आनंदराव बांगर, शेख अंबीर दाऊद, चेतन महाले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री प्रदीप भानगुडे यांनी केले तर आभार सतिश नेने यांनी मानले.