पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडीचे वतीने वंचित बहुजन आघाडीचे संघटना बळकटीकरण व युवक कार्यकर्ता शिबिर रविवार दि.७ रोजी सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महत्वपूर्ण बैठक आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब पातारे आणि वंचित बहुजन आघाडी पारनेर तालुका तसेच पारनेर तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आदींनी दिली आहे.
त्यामुळेच श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना साथ सहयोग देणे व त्यांचे हात बळकट करण्यासाठी चिंतन बैठक आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे.या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसणे, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, जिल्हा सल्लागार जे. डी. शिरसाठ, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन राजेंद्र करंदीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.