पारनेर / भगवान गायकवाड,
अक्षय विठ्ठल कोल्हे हे नाव प्रेरणेतेच प्रतिक बनंल आहे ते श्री विठ्ठल कोंडीबा कोल्हे आणि सौ.संगीता कोल्हे यांचे सुपूत्र आणि कै.कोंडीबा रामचंद्र कोल्हे यांचे नातू आहेत. अक्षयचे ५ वी पर्यंतचे शिक्षण आर्मी स्कूल आग्रा ६ वी ते १० पर्यंतचे शिक्षण आर्मी स्कूल गया बिहार येथे व १२ वी पर्यंतचे शिक्षण आर्मी स्कूल खडकी येथे पूर्ण झालं त्यांनी पुढे इलेक्ट्रॉनिक & टेलिकम्युनिकेशन (EN&TC) All Indian Shree Shivangi Memorial Society (AISSMS) कॉलेज पुणे मधून इंजिनिअरिंग पुर्ण केलं आहे.
अक्षय यांना लहानपणापासूनच शिस्त आणि देश सेवेची प्रेरणा त्यांच्या वडिलांकडून मिळाली त्यांचे वडील सेवानिवृत्त ऑननरी कॅप्टन विठ्ठल कोंडीबा कोल्हे हे मार्च 2025 मध्ये सैन्य दलातून ३४ वर्ष प्रदिर्घ सेवाकरून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या आर्मी मधील जीवनशैली आणि शिस्त पाहून अक्षय यांनी आपल्याला वर्ग एक अधिकारी (Class 1 officer) बनायचं स्वप्न उराशी बाळगलं त्यांची आई संगीता कोल्हे यांनीही त्यांना नेहमीच शिक्षण आणि स्वप्नासाठी पाठिंबा दिला, विशेष म्हणजे कोल्हे कुटूंब शेतकरी कुटंबातील असल्याने त्यांची नाळ शेतीशी जोडली आहे, ज्यावेळेस अक्षयचा निकाल जाहीर झाला त्यावेळेस अक्षयची आई सौ.संगीता कोल्हे हे त्याच्या लोणी हवेली या मुळ गावी शेतीमध्ये मुग तोडत होत्या. आईच्या नेहमीच प्रेरणेने अक्षय यांचा प्रवास अजूनच प्रेरणादायी बनला.
अक्षय गेल्या तीन वर्षापासून या संधीसाठी सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र अत्यंत कठीण निवड प्रक्रिया असल्याने अंतिम मिरीट यादीत त्यांचं नाव येत नव्हतं. तरीही त्यांनी हार मानली नाही आणि आपल्या ध्येयासाठी प्रयत्न सुरूच ठेवले.
त्यांच्या अथांग मेहनतीला यश आलं आणि अखेर संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेतल्या जाणाऱ्या कठीण निवड प्रक्रियेतून त्यांचे थेट लेफ्टनंट (Class 1 officer) पदासाठी निवड झाली देशासाठी काही मोठं करावं आपल्या लोणी हवेली गावाचं आणि पारनेर तालुक्याचे नाव संपूर्ण देशात झळकाव या उद्देशाने त्यांनी भारतीय सैन्य दलात सामील होण्याचा निर्धार केला विशेष म्हणजे अक्षय कोल्हे यांचे वडील विठ्ठल कोल्हे सैन्यदलातून अननरी कॅप्टन पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचाच मुलगा अक्षय वडील ज्या पदावरून सेवानिवृत्त झाले त्याच्यांच पुढच्या एका पदावर वर्ग-१ अधिकारी म्हणून निवड झाली आहे याचेच सर्वोसुत कौतुक होत आहे अक्षय १ ऑक्टोबर पासून अधिकारी प्रशिक्षण अकादमी (OTA) गया येथे अकरा महिन्याचे कठोर ट्रेनिंग पूर्ण करतील त्यानंतर सप्टेंबर २०२६ मध्ये ते भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट (Class 1 officer) म्हणून अधिकृतपणे कमिशन होणार आहेत.
अक्षय कोल्हे यांची प्रवास गाथा आजच्या लोणी हवेलीच्या व पारनेर तालुक्यातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. लोणी हवेली गावातील अक्षय हे पहिलेच युपीएसी पास हेणारे तरून आहेत त्यामुळे स्वप्न मोठ असाव त्यासाठी जिद्द मेहनत आणि समर्पण असले की यश नक्की मिळतं! हे मात्र अक्षयने सिद्ध करून दाखवल आहे या निवडीबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सुभाषराव दुधाडे व लोणी हवलीच्या विद्यमान सरपंच सौ.जानव्हीताई दुधाडे, उपसरपंच अमोल दुधाडे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व सदस्य, लोणी हवेलीतील सर्व नागरिकांनी अक्षयची निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे.