Site icon

पारनेरच्या बसस्थानक प्रवेशद्वारावर अनधिकृत वाहनांची वर्दळ


पारनेर / भगवान गायकवाड,


पारनेर बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि परिसरात अनधिकृत वाहनांनी मोठी गर्दी केल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही अनधिकृत वाहने प्रवेशद्वारावरच उभी राहत असल्याने एसटी बसेस आणि प्रवाशांच्या वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे.


बसस्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या एसटी बसेसना वळण घेण्यास अडचण येत असून, यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना या वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. बसस्थानक आगार प्रमुखांनी यावर वारंवार सूचना देऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
टेम्पो, दुचाकी आणि काही खासगी वाहने थेट प्रवेशद्वारावरच उभी केली जातात. यावर वाहतूक पोलीस आणि बसस्थानक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. स्थानक परिसरात वाहतूक नियंत्रण करण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय त्वरित दूर करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. अन्यथा, भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement
Share This News On
Exit mobile version