Site icon

कुरुंद सोसायटीच्या चेअरमनपदी मनोज खेमनर तर व्हा. चेअरमन पदी अर्जुन रासकर

कुरुंद सोसायटीच्या चेअरमनपदी मनोज खेमनर तर व्हा. चेअरमन पदी अर्जुन रासकर

बिनविरोध निवडीने सोसायटीने राखला आदर्श

पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील कुरुंद विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत चेअरमनपदी मनोज खेमनर, तर व्हाइस चेअरमनपदी ह. भ. प. अर्जुन रासकर महाराज यांची बिनविरोध निवड झाली. ही सेवा सोसायटी युवा नेते कैलास कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी संचालक रमेश गायकवाड, दिलीप कोठावळे, योगेश खांडरे, दत्तात्रय मुरवदे, गोरख कर्डीले, शाहूराव उबाळे, शिवाजी चौधरी, मच्छिंद्र बढे, चव्हाण ताई यांच्यासह रमेश गव्हाणे, कृष्णा मुरवदे, बाबासाहेब खेमनर, गणेश खेमनर, बापू शिंदे, सचिन शेंडगे, दत्तात्रय चौधरी, सोसायटीचे सचिव ठुबे भाऊसाहेब आणि निवडणूक निर्णय अधिकारी श्री. चाबुकस्वार उपस्थित होते.
सोसायटीच्या माध्यमातून गावातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी सक्रियपणे काम करतील, अशी अपेक्षा आहे. या सत्कार समारंभाने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सोसायटीच्या भविष्यातील कार्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

कुरुंद विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून नवनिर्वाचित पदाधिकारी शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहेत. विशेषतः शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी सोसायटी प्रयत्नशील राहील. या निवडणुकीमुळे सोसायटीच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सोसायटीच्या सभासदांना लवकरच गोड बातमी देणार.

कैलास कोठावळे (ग्राम पंचायत सदस्य, कुरुंद)

Advertisement
Share This News On
Exit mobile version