राज्यस्तरीय नवचेतना पुरस्कार सोहळ्यात गौरव – पत्रकारितेतील योगदानाचा सन्मान_
पुणे : दै. आरंभ पर्वच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘राज्यस्तरीय नवचेतना पुरस्कार २०२५’ सोहळ्यात *महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (डिजिटल मीडिया)*चे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सिद्धार्थदादा संजयजी भोकरे यांना ‘आरंभरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रभावी नेतृत्वगुणांबरोबरच डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रातील कार्य, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला.
या सोहळ्याला पत्रकारिता, शिक्षण, उद्योग, समाजकार्य आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा सौ. तृप्तीताई देसाई, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संजयजी चोरडिया, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक मा. श्री. सुधाकरराव जाधवर, उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्व मा. श्री. नानजीभाई ठक्कर, तसेच स्विफ्ट डिटेक्टिव अँड इन्व्हेस्टिगेशनच्या संचालिका मा. सौ. प्रिया काकडे हे मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल मयुरी नव्हाते आणि अभिनेता व युवा उद्योजक ओम यादव हे प्रमुख आकर्षण ठरले. ओम यादव यांच्या विनोदी आणि प्रेरणादायी भाषणाने उपस्थित प्रेक्षकांमध्ये हास्याचा आणि उत्साहाचा माहोल निर्माण झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. सुधाकरराव जाधवर यांनी भूषविले. यावेळी मा. श्री. ॲड. प्रसन्नदादा जगताप, मा. सौ. तृप्तीताई देसाई, मा. श्री. विश्वासराव आरोटे, मा. श्री. काकासाहेब चव्हाण, ओम यादव, मा. श्री. भूपेंद्र मोरे, मा. श्री. बाप्पूसाहेब पोकळे, मा. श्री. रूपेश घुले, आणि मा. श्री. नानाजीभाई ठक्कर यांनी आपली मनोगते व्यक्त करत आरंभ पर्वच्या कार्याचे आणि पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना दै. आरंभ पर्वचे व्यवस्थापकीय संपादक प्रतिक गंगणे यांनी सादर केली, तर आभारप्रदर्शन दै. आरंभ पर्वच्या संस्थापिका तथा संपादिका सौ. सुरेखा मते यांनी केले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन निवासी संपादक मा. श्री. लक्ष्मण साबळे, मार्केटिंग हेड अभिषेक मरगळे, आणि पुणे शहर पत्रकार मा. श्री. महेश वरवटे यांनी संयुक्तपणे केले. सुत्रसंचालनाची जबाबदारी मा. श्री. राज शिनारे यांनी समर्थपणे पार पाडली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाने ‘आरंभ पर्व’ने पुन्हा एकदा पत्रकारितेच्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करत नवचेतनेचा दीप प्रज्वलित केला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ संजयजी भोकरे यांना ‘आरंभरत्न पुरस्कार’ प्रदान

