पारनेर / भगवान गायकवाड,
ओंकार हॉस्पिटल आय सी यू मल्टीस्पेशालिटी ॲन्ड ट्रॉमा सेंटर , सुपा यांनी हॉस्पिटलमध्ये सेवा देणारे डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय साफसफाई कर्मचारी, अँब्युलन्स ड्राइवर, मेडिकल स्टाफ, लॅबोरेटरी स्टाफ, एम आर डी स्टाफ, सीटी स्कॅन स्टाफ, या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करत यंदाच्या दिपावली सणानिमित्त बोनस आणि मिठाईचे वाटप केले.
आरोग्यसेवेत अहोरात्र झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन हॉस्पिटल प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. दिपावलीच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांना भरीव बोनस देण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. यासोबतच, दिपावली सणाचा गोडवा वाढवण्यासाठी सर्वांना मिठाईचे बॉक्सही वाटण्यात आले.
हॉस्पिटलचे संचालक डॉ.बाळासाहेब पठारे, डॉ.नीता पठारे, डॉ.शिवराज पठारे आणि व्यवस्थापक बाळासाहेब उरमुडे ( सर) यांनी यावेळी बोलताना, “आमचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय हेच आमच्या हॉस्पिटलचा आधारस्तंभ आहेत. त्यांनी कोव्हिड काळानंतरही सातत्याने उत्तम सेवा दिली आहे. त्यांच्या मेहनतीचा सन्मान म्हणून ही भेट आहे,” असे मत व्यक्त केले.
बोनस आणि मिठाई मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले. दिपावलीच्या उत्साहात या उपक्रमामुळे हॉस्पिटलमध्ये एक सकारात्मक आणि आनंदी वातावरण निर्माण झाले होते. आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा सन्मान करणारा हा उपक्रम तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.

