Site icon

रविंद्रशेठ राजदेव मित्रमंडळातर्फे नांदुर पठार येथे भव्य “दिवाळी भाऊबीज” उत्सवाचे आयोजन

टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी,

नांदुरपठार: रविंद्रशेठ राजदेव मित्रमंडळातर्फे यंदा दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी भव्य “दिवाळी भाऊबीज उत्सव” आयोजित करण्यात आला आहे. सोनिया रविंद्र राजदेव आणि रविंद्रशेठ राजदेव यांनी सर्व नागरिकांना या आनंदमय सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.


हा उत्सव सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार असून, दिवसभर विविध उपक्रम, भेटवस्तू वाटप आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद लुटता येणार आहे. विशेष आकर्षण म्हणजे भगिनींसाठी खास भेटवस्तू आणि सर्वांसाठी भजी-जिलेबीचा खास बेत!


लोकनेते खासदार नीलेश लंके या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या सहभागाने या सोहळ्याला विशेष रंग चढणार आहे.


या उपक्रमामागे समाजात एकोपा, प्रेम आणि स्नेहबंध वृद्धिंगत करण्याचा उद्देश आहे. पारंपरिक आपुलकी आणि उत्साहाने हा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण वर्ग या उपक्रमाला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत आहेत. “कुटुंबासह या उत्सवात सहभागी व्हा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा,” असे आवाहन सोनिया आणि रविंद्रशेठ राजदेव यांनी केले आहे.

या उत्सवात सहभागी होऊन सणाचा आनंद सामूहिकरित्या साजरा करा!

Advertisement
Share This News On
Exit mobile version