निघोज / सौ.निलम खोसे पाटील,
संदीप पाटील वराळ यांनी गेल्या ११ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या गरीबांची दिवाळी हा उपक्रम सातत्याने सुरूच ठेऊ. या उपक्रमातून सर्वसामान्य लोकांची दिपावली गोड होते. यांना आम्ही कधी ही वाऱ्यावर सोडणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही राजक सोडू, पण हा उपक्रम बंद होऊ देणार नाही अशी ग्वाही संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊन्डेशन चे अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी दिली.
” गरीबांची दिवाळी ” हा उपक्रम पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व निघोजचे माजी सरपंच दिवंगत संदीप वराळ पाटील यांनी खिश्यात पैसा नसतानाही लोकसहभागातून गेल्या ११ वर्षापूर्वी सुरू केला. त्यानिमित्त परवा बुधवारी निघोज येथील कपिलेश्वर मंगल कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गरीब महिलांना एक साडी व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष सचिन वराळ पाटील पुढे म्हणाले की, या उपक्रमात कन्हैय्या परिवाराचे अध्यक्ष दिवंगत शांताराम मामा लंके यांचा सिंहाचा वाटा आहे. या उपक्रमातंगर्त आमची सर्व सामान्यांशी नाळ जोडली गेली आहे. भविष्यात ही आमचे वराळ कुटुंबीय या सर्व सामान्य लोकांबरोबर राहणार आहेत. यांना कोणालाही कसलीही अडचण आल्यास जनसेवा फाऊन्डेशन च्या कार्यालयात संपर्क साधावा. या उपक्रमाला कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येऊ नये , म्हणून अशी अनेक कुटूंबे आहेत की, जी निघोज मध्ये राहत नाही, पण भरीव आर्थिक मदत करतात, तर काही गुप्त मदत ही करतात. माझ्या वराळ भावकीची ही मोठी मदत असते. गावाच्या विकासात आमच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. पत्रकार बांधव ही आपापल्या लेखनी च्या माध्यमातून प्रामाणिक मदत करतात व सर्वदूर प्रसिद्धी देण्याचे काम करतात, असे गौरवोद्गार ही सचिन वराळ पाटील यांनी काढले आहे.
या उपक्रमाचे प्रास्ताविक मुंबई बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुनिल पवार करताना म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून गरीबांची दिवाळी हा उपक्रम संदीप पाटील वराळ राबवत असे, तदनंतर सचिन पाटील वराळ हे राबवत आहे. भावाने हा सुरू केलेला उपक्रम त्यांच्या नंतर भाऊ सचिन पाटील वराळ यांनी अखंड पणे सुरूच ठेवला. जोपर्यंत सुर्य, चंद्र, तारे आहेत, तो पर्यंत वराळ परिवार राहणार आहे, असे गौरवोदगार ही त्यांनी काढले.
तर पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय उनवणे यांनी हा गरीबांची दिवाळी उपक्रम सुरू करण्यापासून ते आता पर्यंतचा ११ वर्षांचा इतिहास मांडला व वराळ परिवारा बद्दल गौरवोद्गार काढले.
यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी व निवड झालेल्या रुक्साना हवालदार, यांची पोलीस दलात निवड, कराटे प्रशिक्षक ओंकार रणसिंग, कराटे खेळाडू सई राऊत, विहा लामखडे, मेथली गायकवाड, परवेझ तांबोळी, आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आर्यन ढवळे, सागर जगताप व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रखमाजी कापसे, युवक काँग्रेसचे पारनेर तालुकाध्यक्ष भास्करराव उचाळे, राळेगण थेरपाळ चे सरपंच पंकज कारखिले, तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंदराव निघोजकर, यांनी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाचे महत्व विशद केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पुष्पा वराळ पाटील, सरपंच चित्रा वराळ पाटील, भाजपा चे नेते अतुलराव माने, शालेय समितीचे अध्यक्ष अप्पा वराळ, पांडुरंग गाडगे, तुकाराम येवले, राहुल वराळ, भाऊसाहेब कोल्हे, गणेश लामखडे, विशाल डेरे, फिरोज शेख, भिमराव लामखडे, अस्लम इनामदार, निलेश घोडे, श्रीकांत वराळ, शरद पवार, रामा वराळ, भास्कर वराळ, शंकर वराळ, अर्जुन वराळ, सुमन बोंबले, बॉबी ताई गायखे, ठकाराम गायखे, रवि रणसिंग, पत्रकार बांधव इतर मान्यवर, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले, तर आभार यांनी मानले.

