Site icon

“शिक्षक घडवतो व्यक्तिमत्व, विद्यार्थी घडवतो इतिहास : शिक्षणाधिकारी धामणे सर

१९९२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय स्नेह मेळावा संपन्न.

पारनेर / भगवान गायकवाड,
          चांगले शिक्षक हे नशिबाने मिळतात.चांगले विद्यार्थी भेटायला सुद्धा नशीब लागते.विद्यार्थ्यांना घडवणे म्हणजे एका रोपट्याचे जतन करून त्यांचे वृक्षात रूपांतर करण्यासारखं आहे.त्या रोपट्याला खतपाणी देताना काही वेळा ताण द्यावा लागतो.जेणे करून त्यांची मूळ घट्ट होते.विद्यार्थांना दिली जाणारी शिक्षा त्यांना सक्षम करण्यासाठी असते.शिक्षक घडवतो व्यक्तिमत्व, विद्यार्थी घडवतो इतिहास ‘ असे प्रतिपादन अरुणराव धामणे ( सर) यांनी केले ते गोरेश्वर माध्यमिक विद्यालय, गोरेगाव ता. पारनेर येथे सन १९९२ वर्षी असलेल्या इयत्ता दहावीमध्ये एकत्र शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३३ वर्षांनंतर भावनिक स्नेह मेळावा आयोजित करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शुक्रवार दि. २४ आक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बोलत होते.


         हा सोहळा गुरु-शिष्य नात्याची सस्नेह अनुभूती देणारा आणि अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक व्ही. एन. गायकवाड सर यांनी भूषवले. जानपा तवले (सर), रामचंद्र सुपेकर (सर,) साठे( सर, )अनाजी दळवी (सर,) चंद्रकांत दलंदले (सर) भालेकर( सर )अशा अनेक शिक्षकांची यावेळी उपस्थिती होती. या विशेष सोहळ्याला त्या काळात गणित विषय शिकविणारे आणि सध्या शिक्षणाधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले अरुणराव धामणे (सर )प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


कार्यक्रमात जुन्या आठवणी, शालेय जीवनातील किस्से आणि गुरु-शिष्य नात्याची सस्नेह अनुभूती यांचा मिलाफ अनुभवायला मिळाला. माजी विद्यार्थ्यांनी एकमुखाने “आमच्या आयुष्यातील खरे प्रेरणास्थान म्हणजे आम्हाला शिकवणारे शिक्षक” असा सूर आळवला. अनेकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळत होते.या वेळी हरिष दावभट, संतोष दहातोंडे, बाळासाहेब नरसाळे, मंदा दावभट, संगिता खोडदे यांनी याप्रसंगी आपली मनोगते व्यक्त केली. ३३ वर्षांपूर्वीच्या आठवणींना नव्या उत्साहाचं रूप देत सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येऊन “जुने दिवस पुन्हा आले” असं वातावरण निर्माण केलं. याप्रसंगी शैलाजा पाठक, मनीषा नरसाळे, राहीबाई नरसाळे, सागर नरसाळे, प्रतिभा पोळ, दिलीप बोंबले, मंदाकिनी नरसाळे, नीता शिनारे, जयसिंग मोढवे, धोंडीभाऊ सुंबे, भागुबाई नरसाळे, गोरक्षनाथ खोडदे, विठ्ठल तांबे, विमल नरसाळे, सतीश कावरे, संतोष चौधरी, अंबादास तांबे, दत्तात्रय चौधरी, बाळू दावभट, रामदास खोडदे, गुलाब शेख, शिवाजी गवळी, संतोष तांबे, सुनील खोडदे, उज्वला तांबे, भाऊसाहेब काकडे, भास्कर काकडे, शिवाजी ठाणगे, सुमन नरसाळे, संपत दावभट, विद्या खोडदे, संगीता खोडदे, दगडू तांबे, गोपीनाथ आडसूळ, छाया नरसाळे, बाबासाहेब नरवडे, दत्तात्रय नरसाळे, बबन थोरात, गोपीनाथ कोरडे, पाटीलबा खोडदे, उत्तम नरसाळे, मनिष तांबे, हरिदास सुंबे, शिवाजी काकडे, मीना नरसाळे, मारुती तांबे, बाबासाहेब तांबे, चंद्रकला कोल्हे, वर्षा टेमकर अशा अनेक माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.


यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी आपलं योगदान देण्याचा निर्धारही व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नरसाळे यांनी उत्कृष्ट केले, तर आभार सखाराम नरसाळे यांनी मानले. शेवटी सर्वांच्या उपस्थितीत “जय गोरेश्वर विद्यालय” या घोषणेनं कार्यक्रमाचा भावनिक वातावरणात समारोप झाला.

Advertisement
Share This News On
Exit mobile version