राज्यस्तरीय ‘वादळी सन्मान पुरस्कार २०२५’ मिळाल्याबद्दल ग्राहक पंचायतीकडून गौरव
पारनेर / प्रतिनिधी,
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नुकताच राज्यस्तरीय ‘वादळी सन्मान पुरस्कार २०२५’ जाहीर झालेले पारनेर येथील पत्रकार भगवान गायकवाड यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा आणि तालुका यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.वादळी स्वातंत्र्य’ साप्ताहिकाच्या १३ व्या वर्धापनानिमित्त ५ ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा येथे आयोजित कार्यक्रमात पत्रकार भगवान गायकवाड यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार साप्ताहिक ‘वादळी स्वातंत्र्य’चे संस्थापक संपादक जितेंद्र पितळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.
पारनेर तालुक्यातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील विषयांवर सडेतोड लिखाण करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारी त्यांची निस्वार्थी पत्रकारिता या पुरस्कारासाठी निर्णायक ठरली होती.
ग्राहक पंचायतीकडून सन्मान….
हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या वतीने पत्रकार भगवान गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी (सर) यांच्या हस्ते त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करण्यात आला.
उपस्थित मान्यवर….
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पारनेर तालुका कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पारनेर तालुका ग्राहक पंचायतचे संघटक बाळासाहेब कोकाटे, महिला अध्यक्षा सुनीता पवार, रोहिणी कासार आदी मान्यवर या सन्मान सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते.
पत्रकार भगवान गायकवाड यांनी आपल्या निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेतून समाजात जागृती निर्माण करण्याचे कार्य सुरूच ठेवल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पत्रकारितेला मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे पारनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

