पारनेर / प्रतिनिधी,
भाजपा राज्य परिषद सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांचा वाढदिवस दि. 28 ऑगस्ट रोजी सामाजिक उपक्रम आणि विविध विकास कामांच्या उद्घाटनाने साजरा होणार आहे. समाजाप्रती दायित्व जपत अनावश्यक खर्च टाळून कोरडे यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा होईल.
यानिमित्ताने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन होणार आहे. यामध्ये वडगाव दर्या येथील निसर्ग पर्यटन केंद्राचे लोकार्पण, किन्ही-बहिरोबावाडी येथील सोलर प्रोजेक्टच्या उभारणीचे भूमिपूजन आणि जवळा येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता विश्वनाथ दादा कोरडे जवळा येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा:
सकाळी ९:०० वा. – वडगाव दर्या येथे निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकासकामांचा लोकार्पण समारंभ. या प्रकल्पामुळे पठार भागात पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
सकाळी १०:०० वा. – कान्हुर पठार येथे ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ. मा. ना. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या प्रयत्नांनी हे बहुप्रतीक्षित स्वप्न पूर्णत्वास येत आहे.
दुपारी १२:३० वा. – मौजे किन्ही येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सौरप्रकल्पाचे भूमिपूजन. मा. ना. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शेतीपंपासाठी वीज मिळेल.
कार्यक्रमाला खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग, राज्य कार्यकारिणी सदस्य भानुदास बेरड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. विश्वनाथ दादा कोरडे मित्र मंडळाने वाढदिवसानिमित्त भेटवस्तूऐवजी देशी झाडे आणण्याचे आवाहन केले आहे.
या उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनासह विकासकामांना चालना मिळणार असून, कोरडे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरणार आहे.