पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी सप्तरंग या भव्य गायन व नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात हजारो रुपयांची पारितोषिके जिंकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी दिली.
कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. प्रांजली भराटे म्हणाल्या, या महोत्सवात वैयक्तिक गायन, भारतीय समूह गायन आणि भारतीय समूह लोकनृत्य अशा तीन प्रमुख स्पर्धांचा समावेश असेल. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. हरेश शेळके म्हणाले, भारतीय समूह लोकनृत्य स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००० रुपये, समूह गायनासाठी ४००० रुपये आणि वैयक्तिक गायनासाठी प्रथम पारितोषिक १००० रुपये निश्चित करण्यात आले आहे. वैयक्तिक गायन स्पर्धेत स्पर्धकांना ३ ते ५ मिनिटांत कोणतेही गीत सादर करता येईल. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. तुकाराम रोंगटे, संगीत तज्ज्ञ प्रा. आदेश चव्हाण आणि भरतनाट्यम विशारद कविता भामरे यांसारखे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. नावनोंदणीसाठी इच्छुकांनी प्रा. ज्ञानेश्वर गुलगे यांच्याशी ७३७८७९५५७१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.तुकाराम थोपटे, अंतर्गत गुणवत्ता सिध्दता कक्ष समन्वयक डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, विदयार्थी विकास अधिकारी डॉ.रवींद्र देशमुख, सहसमन्वयक प्रा. सफिया तांबोळी, प्रा. प्राजंल बोरूडे यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद परिश्रम घेत आहेत.