Site icon

कुसुम मार्तंडनाना पठारे यांचे निधन



पारनेर / प्रतिनिधी,

पारनेर येथील रहिवासी कुसुम मार्तंडनाना पठारे वय 88 यांचे दि. 21 ऑगस्ट २०२५ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्याच्या पाश्चात मुले मुली, सुना,जावई  नातवंडे पुतणे असा मोठा परिवार आहे माजी जिल्हा परिषद सदस्य कै. मार्तंडनाना पठारे यांच्या त्या पत्नी व दिपक पठारे वसंत पठारे यांच्या आई होत्या.अहील्यानगर येथे नुकताच आणीबाणीच्या काळात केलेल्या कामगीरीमूळे त्यांचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता, एक आदर्श माता व गृहीणी होत्या. त्यांनी आपल्या साधेपणा, प्रेमव स्वभाव व धार्मिक वृत्तीमुळे सर्वाच्या मनात विशेष स्थान मिळवले त्या नेहमीच कुटुंब व समाजासाठी कार्यरत राहील्या लहानपणापासुनच त्या कष्टाळू व संस्कारी होत्या. पारनेर व तालुक्याच्या विकासात आणि सामाजिक कार्यात कै.मार्तंडनाना पठारे यांच्या सोबत त्यांचा मोलाचा वाटा होता. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला, त्यामुळे तालुक्यात त्यांच्याबद्दल आदराची भावना होती. त्याच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Share This News On
Exit mobile version