सेनापती बापट विद्यालयात “पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थी भेटीला”

रानकवी तुकाराम धांडे विद्यार्थ्यांच्या भेटीला

पारनेर / भगवान गायकवाड,
      अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे सेनापती बापट माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थी भेटीला” या उपक्रमांतर्गत रानकवी तुकाराम धांडे यांच्या प्रसिद्ध कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब कासार(सर ), कवी दिनेश औटी, सुनिल गायकवाड ( सर), बाळासाहेब बुगे,विद्यालयाचे शिक्षक , शिक्षिका वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.


       आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची.आम्ही बोडखी, बाळ परवरा माईची” माती आणि माता यांना खूप सांभाळले पाहिजे कारण त्यांच्याकडून आपण खूप शिकत असतो. आपले विचारसरणी तयार झालेली असते असे प्रतिपादन रानकवी तुकाराम धांडे यांनी केले. येथील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सेनापती बापट माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला” या उपक्रमांतर्गत इयत्ता नववीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील” वनवासी”ही कविता प्रत्यक्ष कवी  धांडे यांनी म्हणून दाखवली.

याप्रसंगी दिनेश औटी व मुख्याध्यापक  रावसाहेब कासार उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना रानकवी  धांडे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की कविता हे माझे आत्मचरित्र आहे आणि कवीला समजून घेणे म्हणजे कविता जगणे होय. आपण सर्वांनी निसर्ग समजून घेतला पाहिजे. निसर्ग नियम म्हणजे सायन्स होय. आपण निसर्गाशी जमून घेतले तर जीवन आनंददायी होईल. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपली कुवत ओळखायला शिकले पाहिजे

Advertisement
Share This News On
Exit mobile version