पारनेर / भगवान गायकवाड,
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील आठ खेळाडूंची राज्यस्तरीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच प्रवरानगर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केल्याने दि. २ ते ५ सप्टेंबर रोजी बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत हे खेळाडू अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
यामध्ये श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेचे विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे -
१६ वर्ष वयोगटात लांब उडीमध्ये रुद्र लोखंडे याने प्रथम क्रमांक तर अथर्व ढवळे याने द्वितीय क्रमांक मिळवला.
मुलींमध्ये लांब उडीत नागेश्वरी वाघमारे हिने प्रथम क्रमांक तर समिक्षा वाळुंज हिने द्वितीय क्रमांक पटकावला. श्रेया पठारे हिने पॅन्टाथलॉन क्रीडाप्रकारात द्वितीय क्रमांक, साक्षी बनकर हिने गोळा फेक मध्ये तृतीय क्रमांक पटकावला.
विद्याधाम प्रशाला शिरुर येथे शिकत असलेले खेळाडू जान्हवी वाघमारे हिने लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक, तर कोमल बनकर हिने १८ वर्ष वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला. २० वर्ष वयोगटात वेदिका धावडे हिने लांब उडी व तिहेरी उडीत प्रथम क्रमांक पटकावला.
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक संदीप घावटे, अमोल कातोरे, सतीश झांबरे, सचिन रासकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष अनिलजी बोरा, सचिव नंदकुमार निकम सर, देवदैठण शाळा समितीचे अध्यक्ष चंदुलालजी चोरडिया, शिरूर शाळा समितीचे अध्यक्ष धरमचंदजी फुलफगर, प्राचार्य विशाल डोके, प्राचार्य गुरुदत्त पाचर्णे,पर्यवेक्षक नामदेव डुंबरे यांनी यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.