Site icon

म्हसोबा झाप परिसरातून आंदोलकांसाठी पोहोचल्या अडीच हजार भाकरी

सरपंच प्रकाश गाजरे यांच्या आवाहनाला ग्रामस्थांचा प्रतिसाद


पारनेर / भगवान गायकवाड,
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या न्याय हक्कासाठी मनोज जरांगे यांनी मुंबई येथे आझाद सुरू केलेल्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे उपोषण स्थळी असलेल्या आंदोलकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील म्हसोबा झाप पोखरी वारणवाडी या भागामधून म्हसोबाचापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी मदतीचे आवाहन रविवारी सकाळी केले होते त्यानुसार रविवारी सायंकाळी जवळपास बहुजन समाजातील सर्वांनी एक भाकर आपल्या समाजासाठी या संकल्पनेतून जवळपास म्हसोबा झाप, पोखरी, वारणवाडी, कन्हेर, गुरेवाडी, वाळूंज झाप, बनवस्ती, गाढवे झाप, रोहकले झाप, भोरवाडी, शिंदेवाडी फाटा या भागातून जवळपास अडीच हजारापेक्षा जास्त भाकरी जमा झाल्या भाकरीवर मिरची, लोणचं सुकीभाजी असे खाण्याची पदार्थ देण्यात आले.
सर्व भाकरी जमा करणे व मुंबई या ठिकाणी आंदोलन स्थळी पोहोचविण्यासाठी सरपंच प्रकाश गाजरे, पांडुरंग आहेर, अशोक आहेर, रावसाहेब गाढवे, सिद्धू आहेर, राजेंद्र आहेर, संतोष बेलकर, रवींद्र गाजरे, राहुल गाजरे, बाळासाहेब बेलकर, संजय बेलकर, सचिन गाजरे, अजित गुंजाळ, विकास गुंजाळ, सुनील गुंजाळ, प्रशांत गुंजाळ, वैभव गुंजाळ, अजय वाघ, गणेश वाकळे, प्रशांत गिरी, प्रशांत भालके, अविनाश आहेर, पांडुरंग जाधव, बारकू जाधव, संकेत आरोटे, संजय दरेकर, संकेत दरेकर, स्वप्निल दरेकर, हरिभाऊ रोहकले, राहुल रोहकले, तुषार रोहकले, संदेश शिंदे, अविनाश हांडे, प्रवीण शिंदे, अशोक शिंदे, जयराम आहेर, अजित आहेर, अजित सहाने, निखिल आहेर, निलेश दरेकर, सखाराम शिंदे, धोंडीभाऊ शिंदे, अशोक वाळुंज, विकास वाळुंज, केतन वाळुंज, यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व अडीच हजार भाकरी गोळा करून त्या रविवारी रात्रीच आंदोलन स्थळी पाठविण्यात आल्या असून त्या ठिकाणी वाटप करण्यात आल्या आहेत. सर्व समाज घटकातील ग्रामस्थांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिल्यामुळे सरपंच प्रकाश गाजरे यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
यावेळी म्हसोबा झाप परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

Advertisement
Share This News On
Exit mobile version