गणेशोत्सवात कार्यकर्त्याला सन्मान देत काशिनाथ दाते यांनी जिंकली मने
पारनेर / प्रतिनिधी,
सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी आपल्या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आमदार दाते यांच्या घरी गणपती बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली असून, यंदा त्यांनी आपल्या जवळच्या धोत्रे येथील सच्चा कार्यकर्ते सुभाष सासवडे यांना घरी बोलावून गणपतीच्या आरतीचा मान दिला. हा सन्मान मिळाल्याने सासवडे आश्चर्यचकित झाले आणि त्यांना आनंद झाला.
आमदार काशिनाथ दाते यांचा कार्यकर्त्यांप्रती असलेला स्नेह आणि साधेपणा यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. ते नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्राधान्य देतात आणि त्यांनी सुचवलेली विकासकामे तसेच विविध प्रश्न व समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्पर असतात. सासवडे यांना अचानक फोन करून आरतीसाठी बोलावल्याने दाते यांचा कार्यकर्त्यांशी असलेला जवळचा संवाद दिसून आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पारनेरात परंपरा आणि संस्कृती जपण्याबरोबरच सामाजिक एकतेचा संदेशही दाते यांनी दिला आहे.
आमदार काशिनाथ दाते यांचा साधेपणा: कार्यकर्त्याला गणपती आरतीचा मान
