पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर शहरातील विनायक विद्या मंदिर या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी अश्विनी अंकुश पोटे यांच्या मातोश्री विजया अंकुश पोटे यांनी शिक्षक दिनानिमित्त शाळेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेला पत्रे आणि ब्लॉक बसवण्यासाठी शालेय विकास निधी म्हणून ५००० रुपये आर्थिक मदत प्रदान केली आहे.त्यांच्या या शाळेप्रति असलेल्या आपुलकीचे विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष शाहूराव औटी ,उपाध्यक्षा जयश्रीताई औटी यांनी कडून अभिनंदन करण्यात आले .यावेळी मुख्याध्यापिका शोभा बांदल, शिक्षिका जयश्री कोरडे, सविता औटी आणि शिक्षक प्रवीण साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
पारनेर शहर आणि परिसरातील गोर गरीब विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सतत शालेय विविध उपक्रम राबवून शाळेने तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.विनायक विद्या मंदिर सेमी इंग्लिश स्कूल आहे. आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. इंग्रजी माध्यम शाळेत सुरू झाले तरी या शाळेत संस्कृती, संस्कार आणि मूल्यांची जपणूक केली जात आहे. उत्कृष्ट विद्यार्थी घडविणे हेच शाळेचे ध्येय असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध स्पर्धा, उपक्रम, बौध्दिक परीक्षा घेतल्या जात असल्याची माहिती मुख्याध्यापिका शोभा बांदल यांनी दिली.
शाळेच्या प्रगतीसाठी, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी हा निधी निश्चतच उपयुक्त ठरेल. समाजाप्रती शिक्षण संस्थे प्रती असलेली त्यांची आत्मियता, जिव्हाळा आणि कृतज्ञता यातून स्पष्टपणे दिसून येते. अशा प्रकारे देणगी मुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सोय सुविधा मिळतील आणि शाळेचा सर्वांगीण विकास साधता येईल.
– शाहूराव औटी, अध्यक्ष, विनायक विद्या मंदिर, पारनेर