धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी गणेश उत्सव साजरा
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याच्या आदिवासी भागातील पळशी येथे गणेश उत्सव मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा होत आहे पळशी गावातील दोस्ती ग्रुप गणेशोत्सव मंडळाने याही वर्षी जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला मंडळाचे मार्गदर्शक पळशी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश राठोड व मंडळाचे अध्यक्ष शरदराव शिंदे यांनी गणेश उत्सव काळात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच महाप्रसादाचे आयोजन केले होते.
आदिवासी भागातील सर्व समाजाने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात या गणेशोत्सवामध्ये सहभाग नोंदविला. गणपती विसर्जनाच्या दिवशी ज्येष्ठ नेते मोहनराव रोकडे, उद्योजक अशोकभाऊ खराबी व नगर सह्याद्री वृत्तपत्राचे पारनेर तालुका प्रतिनिधी पत्रकार गणेश जगदाळे यांच्या शुभहस्ते महाआरती संपूर्ण झाली.
पळशी माळवाडी येथील दोस्ती ग्रुप गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सरपंच प्रकाश राठोड व अध्यक्ष शरद शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे सत्कार व सन्मान केला.
यावेळी जेष्ठ नेते मोहनराव रोकडे यांनी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देत असताना रोकडे म्हणाले की पळशी येथील आदिवासी पट्ट्यातील माळवाडी या ठिकाणी दोस्ती ग्रुप हा गणेशोत्सव व निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतो हे सर्व कार्यक्रम आमचे सहकारी मित्र पळशी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश राठोड यांच्या नियोजनाखाली सर्व सुरू असते आदिवासी समाज मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात या गणेशोत्सव काळात सक्रिय असतो व गणरायाची मनोभावे पूजा करतो आजच्या काळामध्ये आदिवासी समाजामध्ये जो एकोपा दिसत आहे तो खऱ्या अर्थाने वाखण्याजोगा असल्याचे ज्येष्ठ नेते रोकडे यांनी यांनी आदिवासी भागातील गणेश भक्तांना शुभेच्छा सांगितले.
यावेळी सरपंच प्रकाश राठोड, दोस्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शरद शिंदे, प्रेम राठोड, हिरामण चिकणे, सचिन राठोड, अभिजीत राठोड, सुभाष राठोड, ईश्वर राठोड, दिलीप राठोड, देविदास राठोड, वसंत गांगड, अशोक गांगड, बाबासाहेब राठोड, ऋतिक गांगड, भाऊसाहेब वारे, हेमाजी गांगड, अक्षय वारे, अक्षय राठोड, मयूर राठोड, चंद्रकांत मधे, दीपक राठोड, प्रदीप राठोड, पुनाजी वारे, विजय राठोड, सुरेश गांगड, सिताराम वारे, अंकुश केदार, अनिल गांगड, किरण गांगड, अक्षय गांगड, अनिल गांगड, पप्पू जाधव, सुशांत राठोड, बन्सी गांगड, बारकू गांगड, सोपान गांगड, अमर शिंदे, सागर शिंदे, दीपक गांगड, सोमनाथ मधे, साहेबराव गांगड, विकास झिटे, ज्ञानदेव झिटे, पंढरीनाथ केदार, नवनाथ केदार, उमाजी गांगड, संजय राठोड, भाऊसाहेब गांगड, सागर वारे, योगेश गांगड, मंगेश गांगड, अशोक जाधव, नानाभाऊ गांगड, दीपक मधे, एकनाथ चिकणे, सोनू गांगड,निवृत्ती गांगड, नामदेव मधे, विजय गांगड, मंजाबापू झिटे, वसंत वारे, लहू चिकणे, अशोक दुधवडे, सुभाष गांगड, रवींद्र गांगड, दारूभाऊ राठोड, विकास जाधव, परसराम गांगड, अनिल गांगड आदी पळशी माळवाडी येथील आदिवासी गणेश भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाला निरोप देत असताना सर्व भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.
गणेश उत्सव काळात आदिवासी समाजामध्ये एकोप्याची भावना : उद्योजक अशोक खराबी
गणेश उत्सव काळात पळशी येथे दोस्ती ग्रुप आदिवासी भागामध्ये सरपंच प्रकाश राठोड व शरद शिंदे हे सर्व बांधवांना एकत्र ठेवून मोठ्या आनंदमय वातावरणात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये गणेश उत्सव साजरा करतात यामुळे एकोप्याची भावना जिवंत राहत आहे. असे मत उद्योजक अशोक खराबी यांनी व्यक्त केले.