Site icon

सुपा गावाजवळ बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण


पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील सुपा गावाजवळ जिजाबा गवळी वस्ती येथे गेल्या चार दिवसांपासून वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शनिवार, 6 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान एक बिबट्या जेरबंद झाला. सुपा गावचे सरपंच मनीषा रोकडे, माजी उपसरपंच सागर मैड आणि सामाजिक कार्यकर्ते भाऊ निवडूंगे यांच्या माहितीनुसार, गावात बिबट्याच्या वावरामुळे भीती पसरली होती. त्यानुसार वन विभागाने पिंजरा लावला होता. वनपरिक्षेत्र अधिकारी जी. व्ही. धाडे, वनपाल एम. वाय. शेख, वनरक्षक अप्सर पठाण, वनमजूर काशिनाथ पठारे आणि वाहनचालक दिगंबर विरोळे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
शुक्रवारी रात्री अडीचच्या दरम्यान सुपा गावातील सफलता हॉटेलच्या मागे बिबट्याने शेतकरी आकाश पवार यांच्या शेळीवर हल्ला करून ती खाल्ली आहे. गावापासून अगदी जवळ बिबट्याचा वावर दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी परिसरात आणखी बिबट्यांचा धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी सावध राहण्याचा आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेमुळे सुपा परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कता वाढली असून, वन विभाग पुढील कारवाईसाठी सज्ज आहे.

सुपा परिसरात नागरिकांना बिबट्या दिसून आला तसेच जनावरांवर त्याने हल्ला केला हे लक्षात घेऊन सुपा परिसरात पिंजरा बसविण्यात आला आहे. एक बिबट्या शनिवारी पहाटे पिंजऱ्यामध्ये अडकला अजूनही बिबटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे परिसरात पिंजरे बसविण्यात आले आहेत वनविभाग सतर्क आहे ग्रामस्थांनी सुद्धा सतर्क रहावे.

अप्सर पठाण (वनरक्षक)

सुपा गावा लगतच बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे व या भागातील जनावरांवर बिबट्याने हल्ला केला आहे त्यामुळे सुपा परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे लक्षात येते ग्रामस्थांनी बिबट्या असल्याने सतर्क रहावे. तीन ते चार पिंजरे पासून वन विभागाने बिबट्या पकडण्याची मोहीम हातात घ्यावी.

– भाऊ निवडूंगे (सामाजिक कार्यकर्ते)

Advertisement
Share This News On
Exit mobile version