पारनेर मध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; शेतकरी नेते अनिल देठे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नाराज असल्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी
पारनेर / प्रतिनिधी,
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादीच्या पारनेर येथील बैठकीत नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते अनिल देठे यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व समस्यांसाठी अनिल देठे हे तालुक्यात जिल्ह्यात काम करत आहेत खासदार निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांना ओळखले जात होते.
लोकसभा निवडणुकीत पारनेर तालुक्यातील पठार भागावर किनी करंडी भैरोबा वाडी या परिसरातून निलेश लंके यांना मोठे मताधिक्य अनिल देठे यांनी दिले होते. अनिल देठे यांचे शेतकरी चळवळीच्या माध्यमातून मोठे काम असून त्यांचे युवकांचे संघटन व शेतकरी हिताचे संघटन मोठे आहे. आमदार काशिनाथ दाते यांच्या संयमी नेतृत्वाला प्रभावित होऊन शेतकरी नेते देठे यांनी पारनेर येथे राष्ट्रवादीच्या बैठकीत पक्षप्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, संदीप कपाळे, विजय औटी, भास्कर उचाळे, सुषमा रावडे, अपर्णा खामकर, सुधामती कवाद आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शेतकरी नेते अनिल देठे यांच्या प्रवेशाने पठार भागावर खासदार निलेश लंके यांना मोठा फटका बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची ताकद नक्कीच वाढणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये अनिल देठे हे इच्छुकांच्या यादीत नक्कीच असतील. समाज माध्यमांमधून त्यांनी यापूर्वीच पंचायत समिती साठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.