प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राचा सामाजिक उपक्रम
पारनेर / भगवान गायकवाड,
श्रीनाथ शिक्षण संस्थेचे पुणेवाडी येथील भैरवनाथ विद्यालय येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्र यांच्या विद्यमाने मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अभियानाच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी चेडे ( सर) होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये राम भाई,शिक्षिका सरस्वती जावळे, स्मिता चव्हाण, कृपाली टेकाळे, शिक्षक प्रभाकर गायकवाड, प्रमोद ठुबे, संकेत हारदे, ओंकार औटी, देवराम दुश्मन, गोरख शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाची प्रस्तावना मिरा पुजारी यांनी केली. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी साधना दिदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण पारनेर तालुक्यात मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी उपस्थित शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी कडून मुल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियानची शपथ वदवून घेतली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ब्रह्माकुमारी साधना दिदी म्हणाल्या की, विद्यालयीन शिक्षणा सोबतच ईश्वराने मानवी जीवनात त्यात हि खास विद्यार्थी जीवन हे निरागस व निर्दोष, निश्चछंदपणे आणि मुक्तपणे जगायला शिकवते. कारण जसे रोज शाळेत आल्यावर आपण प्रार्थना करतो ईश्वराला आठवण करतो तर ईश्वराला फुले अर्पण केली जातात. जसे वेगवेगळ्या प्रकारची फुले अर्पण केली जातात. तसेच लहान मुले हि देवाघरची फुले असतात. जस फुला मध्ये सुगंध असतो. तसेच ईश्वराने अनेक प्रकारचे दैवी गुण आपल्यामध्ये भरलेले आहेत. हि ईश्वराची अनुपम, अनुकंपा कृपा आशीर्वाद आहे.
सूत्रसंचालन मिरा पुजारी यांनी केले तर आभार ईश्वरीय परिवाराने मानले.