Site icon

शिक्षक बँकेतील कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन समुपदेशनाने बदल्या; शिक्षक बदल्यांचे वारे शिक्षक बँकेतही दिसले

अहिल्यानगर / भगवान गायकवाड,

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनु समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील शाखाधिकार्‍यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा नेहमी वेगळ्या अर्थाने चर्चेचा विषय होत असल्याने नेत्यांच्या सूचनेनुसार संचालक मंडळाने खूप वर्षानंतर पारदर्शी बदल्या केल्या आहेत. या बदल्या करताना कोणाचाही रोष येऊ नये म्हणून संचालक मंडळांने सर्व शाखाधिकार्‍यांना समक्ष बोलावून ऑनलाईन पद्धतीने समुपदेशन केले व प्रत्येकाला आपल्या सेवाजेष्ठतेने जी शाखा पाहिजे ती शाखा देण्यात आली. ज्याप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन झालेले आहेत त्याच पद्धतीने या बदल्या करण्यात आल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.


      यावेळी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, राज्य संघांचे उपाध्यक्ष श्री. दत्ता पाटील कुलट, नाशिक विभागीय अध्यक्ष श्री. राजेंद्र सदगीर, उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष श्री शरद भाऊ सुद्रिक ,मंडळाचे नेते श्री अर्जुन शिरसाठ, श्री बाबासाहेब खरात, संघांचे अध्यक्ष श्री बबन दादा गाडेकर, मंडळाचे अध्यक्ष संतोष दुसुंगे, कार्यकारी अध्यक्ष श्री नारायण पिसे, मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री आबासाहेब दळवी,  पेन्शन संघटनेचे राज्य सहकार्याध्यक्ष श्री राजेंद्र ठोकळ, बँकेचे चेअरमन श्री बाळासाहेब तापकीर, बँकेचे व्हाईस चेअरमन  श्री योगेश वाघमारे, ऐक्य मंडळाचे नेते श्री राजेंद्र निमसे, श्री भास्करराव कराळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री बाळासाहेब कापसे,  माजी व्हाईस चेअरमन श्री सुयोग पवार,  विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रल्हाद  भालेकर, कार्याध्यक्ष बाबा आव्हाड,संचालक श्री संदीप मोटे, श्री कारभारी बाबर, रामेश्वर चोपडे, कैलास सारोक्ते, गोरक्ष विटनोर, महेश भणभने ज्ञानेश्वर शिरसाठ,  मा.चेअरमन श्री पांडुरंग काळे, श्री. नदकुमार गोडसे, श्री.इकडे सर,श्री. चाचर सर, मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप, उपमुख्य कार्य कारी अधिकारी श्री गणेश पाटील यांसह सर्व शाखाधिकारी उपस्थित होते.
      शिक्षक बँकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे हे मोठे दिव्य आहे. कारण बँकेचे सर्वच कर्मचारी हे शिक्षकांचीच मुले आहेत. त्यातही बरेचशे शिक्षक नेत्यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्यांची बदली करावयाची म्हटली की शिक्षक नेतेमंडळीचा प्रचंड दबाव येतो आणि मग ती बदली एक तर मागे फिरवावी लागते किंवा करताच येत नाही. अशी आजपर्यंतची पद्धत होती. परंतु गुरुमाऊली-सदिच्छा मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी याबाबत सर्वांशी चर्चा करून कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून बदल्या करण्याचा निर्णय घेतला त्या पद्धतीने नुकत्याच बँकेचे चेअरमन बाळासाहेब तापकीर व्हाईस चेअरमन योगेश वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप इतर संचालक यांच्या उपस्थितीमध्ये व शाखाधिकार्‍यांना समक्ष बोलावून त्यांच्या सेवाजेष्ठतेनुसार पारदर्शी बदल्या करण्यात आल्या.
बँकेच्या इतिहासात प्रथमच या पद्धतीने कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही अशा समुपदेशनाने बदल्या झाल्याने जिल्ह्यातील सभासदांनी देखील समाधान व्यक्त केले आहे .


गेली अनेक वर्ष शाखाधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. शिक्षक बँक ही एक जिल्ह्यातील महत्वाची आर्थिक संस्था आहे. आणि बँकेच्या प्रशासनामध्ये कोणत्याही प्रकारची ढिलाई रिझर्व बँक ऑफ इंडिया यांना मान्य नसल्याने बँकेचे सर्व नियम पाळीत या बदल्या करण्यात आल्या . बँकेच्या प्रत्येक शाखेत अनेक कर्मचारी वर्षानुवर्षी एकाच ठिकाणी असून यातून सभासदांचे व त्यांचे ऋणानुबंध निर्माण झाले आहे या गोष्टीचा कधी कधी बँकेला तोटा देखील होतो हि बाब लक्षात घेऊन थोड्याच दिवसात कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या केल्या जाणार असल्याचे समजते .

बँकेत आर्थिक विषयाबाबत गेल्या आठ वर्षापासून अतिशय पारदर्शीपणे कारभार होत होता त्याचप्रमाणे कर्मचारी बदली मध्ये पण पारदर्शीपणा यावा अशा मंडळाच्या धोरणानुसार संचालक मंडळाने ही प्रक्रिया राबवली त्याबद्दल जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने संचालक मंडळाचे खूप खूप आभार

– बापुसाहेब तांबे

Advertisement
Share This News On
Exit mobile version