मुख्याध्यापिका शोभना बांदल राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित

पारनेर / भगवान गायकवाड,

   रायझिंग ट्रायबल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटना अहिल्यानगर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 यावर्षी विनायक विद्या मंदिर पारनेर शाळेतील मुख्याध्यापिका शोभना बबनराव बांदल यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण दिनकर टेमकर,सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालक रमाकांत काठमोरे ,मनपा शिक्षण विभाग अधिकारी जुबेर पठाण, संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक संघटना के पी पाटील, जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक संघटना प्रसाद शिंदे सर, तालुकाध्यक्ष प्रवीण साळवे सर आदी मान्यवर उपस्थित होते.


        शिक्षिका बांदल राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल  समाज विकास मंडळ पारनेर या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शाहुराव औटी, उपाध्यक्ष जयश्रीताई औटी, सर्व पदाधिकारी, शिक्षक पालक, शिक्षक प्रवीण साळवे, औटी सविता, जयश्री कोरडे, अर्चना जेऊरकर आदींनी अभिनंदन केले आहे.

शिक्षिका शोभना बांदल यांनी विनायक विद्या मंदिर पारनेर या शाळेत गेली २७  वर्ष प्रामाणिक पणाने अध्यापनाचे कार्य करत अनेक यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचीच ही पावती त्यांना पुरस्कारातून मिळाली आहे

  – शाहुराव औटी,संस्थापक/अध्यक्ष

Advertisement
Share This News On
Exit mobile version