Site icon

पोखरी येथे मस्जिद वॉल कंपाऊंडसाठी खासदार निलेश लंके यांच्याकडून 15 लाखांचा निधी मंजूर

पोखरी येथे विकास कामांचे भूमिपूजन


पारनेर/प्रतिनिधी,
पोखरी गावातील मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार मस्जिद वॉल कंपाऊंडच्या कामासाठी खासदार निलेश लंके यांनी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून, गावकऱ्यांनी खासदार लंके यांचे आभार मानले आहेत. या कामाच्या उद्घाटन प्रसंगी गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाला मा. चेअरमन निजामभाई पटेल, सतीश पाटील पवार,  रामदास पवार, माजी उपसरपंच बाळासाहेब शिंदे, नामदेव करंजेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळशीराम शिंदे, वाराणवाडीचे सरपंच संजय काशीद, साहेबराव करंजेकर, पंडित पवार, अशोक आहेर, रंगनाथ मामा करंजेकर, मुन्ना दादा सय्यद, कासम मोमीन, जाफर पटेल, उंबर पटेल, रफिक पटेल, हारून शेख, बाबा शेख, तारमोहम्मद शेख, मन्सूर पटेल, अकबर पटेल, अमीन पटेल, अन्सार पटेल, पपू पटेल, मुनीर पटेल, अरमान शेख, पपूभाई सय्यद, मुन्ना पटेल, राजू अत्तार, सोयल मोमीन, हसन मोमीन, फिरोज पटेल, लतीफ पटेल, समीर पटेल, जमीर पटेल, समीर शेख, हुसैन पटेल, साकील शेख, सॊहेब अत्तार, मजू पटेल, अमन शेख, नबी मोमीन, अशोक करंजकर, सिताराम पवार, अशोक पाटील, अक्षय खैरे, विनोद खैरे, विकास कसबे, अनिल कसबे, पोपट कसबे, माणिक फरतारे, माजी उपसरपंच कुंडलिक पवार, सिताराम केदार, बबन वाकळे, पोपट वाकळे, दत्ता वाकळे, विक्रम पवार, अनिल शिंदे, शांता पवार, राहुल केदार, गोविंद मधे, सुनील केदार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार निलेश लंके यांनी गावकऱ्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून दिल्याने गावकऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले. हे काम गावातील सामाजिक सलोखा वाढवण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Advertisement
Share This News On
Exit mobile version