पारनेर / भगवान गायकवाड,
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सुचनेनुसार तालुक्यात दि.१७ सप्टेंबर २०२५ ते दि.२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान “सेवा पंधरवडा अभियान” आयोजित करण्यात आले आहे.
त्यामध्ये टाकळी ढोकेश्वर येथे दि.१७/९/२५ रोजी स.९ ते ४ भव्य रक्तदान शिबीर व रांगोळी स्पर्धा.
दि.१८ रोजी मुलिकादेवी विद्यालय निघोज येथे स.११ वा. चित्रकला स्पर्धा.
दि.१९ रोजी स.१० वा. पारनेर-वडनेर हवेली रोड(ईनाम जमीन) येथे वृक्षारोपण.
दि.२० रोजी स.९ ते १२ केदारेश्वर मैदान बाभूळवाडे येथे क्रिकेट स्पर्धा उद्घाटन.
दि.२२ रोजी स.१० वा. अळकुटी येथे रांगोळी स्पर्धा.
दि.२३ रोजी स.१० वा. धर्मनाथ विद्यालय जवळा येथे पुस्तक वाटप व दिव्यांग व्यक्तींचा सन्मान.
दि.२५ रोजी स.१० वा. जनता विद्या मंदिर कान्हूर पठार येथे चित्रकला स्पर्धा व पंडित दीनदयाळ जयंती
आणि दि.२/१०/२५ रोजी स.१० वा. वडगाव दर्या पर्यटन स्थळ येथे स्वच्छता मोहीम.
अशा कार्यक्रमांचे आयोजन पारनेर भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
हे सर्व कार्यक्रम जिल्हाध्यक्ष मा.श्री.दिलीपराव भालसिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य परिषद सदस्य मा.श्री.विश्वनाथ दादा कोरडे, जिल्हा सरचिटणीस सुभाषराव दुधाडे, मंडल अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, शिवाजीकाका खिलारी, किसनराव शिंदे यांच्या सहकार्याने आणि सचिन पाटील वराळ, पंकजदादा कारखिले, दिनेशदादा बाबर, सोनालीताई सालके, अर्जुनराव नवले, सागर आबा मैड, मनोज मुंगसे, लहुशेठ भालेकर, कमलाकर बेलोटे, कानिफनाथ ठुबे,सुशांतराव ठुबे, संतोष सातपुते, बाळासाहेब आवारी, आनंद गांधी, विलास हारदे, मनोहर राउत आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या मदतीने पार पडणार आहे.

