गावच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध : सरपंच प्रकाश राठोड
पळशी येथे स्मशानभूमी कामाचे भूमिपूजन संपन्न
पारनेर/प्रतिनिधी :
स्मशानभूमी ही गावाच्या मूलभूत सुविधांपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित होता, ज्यामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. खासदार निलेश लंके यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आम्ही या कामाला गती देऊन लवकरात लवकर ते पूर्ण करू. गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, असे सरपंच प्रकाश राठोड यांनी सांगितले.
गावातील प्रलंबित स्मशानभूमी कामाचे भूमिपूजन गावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. गावच्या भौतिक जनसुविधांपैकी महत्त्वाचा भाग असलेल्या स्मशानभूमीसाठी सरपंच प्रकाश राठोड गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करत होते. नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या मध्यस्थीमुळे हा प्रश्न मार्गी लागला असून, गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास सरपंच प्रकाश राठोड यांच्यासह गणेश हाके, गणेश शिंदे, राजेंद्र सुडके, ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, बन्सी गागरे, माजी सरपंच प्रभाकर अण्णा गागरे, विकास हिंगडे, विलास साळवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत जाधव, माजी चेअरमन अंबरनाथ वाळुंज, राजेंद्र जाधव, ठकाजी सरोदे गा् सदस्य माजी सरपंच विष्णू मधे, सुखदेव मोढवे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदू शिंदे, सुनील हिंगडे, निवृत्ती मैड, गणेश कोकाटे, विष्णू चिकणे, एकनाथ सुडके, अण्णा सुडके, पांडुरंग मोढवे, रवींद्र गागरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याने गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

