ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान : आमदार काशिनाथ दाते
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा खडकवाडीत शुभारंभ
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील खडकवाडी ग्रामपंचायतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ विशेष ग्रामसभेद्वारे करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार काशिनाथ दाते, गटविकास अधिकारी दयानंद पवार आणि सरपंच शोभा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार दाते यांनी ग्रामस्थांना या योजनेच्या उद्देशांबाबत मार्गदर्शन केले. १७ सप्टेंबर २०२५ पासून राज्यभर लागू झालेली ही योजना ग्रामपंचायतींना सक्षम करून गावांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देते. यात पाणीपुरवठा, रस्ते, शौचालय, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. लोकसहभागावर आधारित या योजनेत सरपंच आणि ग्रामस्थ एकत्रितपणे विकासकामांचे नियोजन आणि अंमलबजावणी करतात. यामुळे ग्रामीण भागात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती होण्यास चालना मिळेल.
राज्यस्तरीय कार्यशाळांद्वारे सरपंचांना प्रशिक्षण देऊन ही योजना यशस्वी करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे ‘सशक्त पंचायत, समृद्ध महाराष्ट्र’ हे ध्येय साकार होईल, असे दाते यांनी सांगितले.
यावेळी डॉ. किशोर उर्फ बाबासाहेब ढोकळे, उपसरपंच अर्चना गागरे, विकास रोकडे, अमोल रोकडे, किरण वाबळे, अरुण गागरे, योगेश शिंदे, डॉ. नितीन ढोकळे, बाळासाहेब शिंगोटे सर, अविनाश ढोकळे, साबाजी गागरे, भाऊसाहेब गागरे, सखाराम नवले, धनंजय ढोकळे, कैलास आग्रे, अमोल म्हस्के, वैभव चौधरी, जनार्धन बोबडे, तुषार शिंदे, आदित्य दळवी, देविदास साळुंके, अशोक गागरे, सुरेश ढोकळे, अंकुश गागरे, आण्णा घेमुड, पांडुरंग रोहकले, काशिनाथ रोहकले, प्रसाद कर्णावट, प्रदीप ढोकळे, शिवाजी रोकडे, पोपट हुलावळे, गणेश चौधरी, आंबदास नवले, संपत हुलावळे, सागर शिंगोटे, अजिंक्य ढोकळे, अभिजित गागरे,
जयश्री वाबळे, अक्षदा गागरे, अलका शिंदे, शशिकला शिंदे, अलका मुरुडे, प्रज्योती गागरे, रूपाली कुटे, वनिता शिंदे, सुरेखा इघे, अन्नपूर्णा हिंगमिरे, कविता रोकडे, मीना ढोकळे, मीराबाई हुलावळे, कल्पना गागरे, मंगल इघे, ग्रामसेविका पंदारे मॅडम, आदी खडकवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

