भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रपतींना निवेदन
अहिल्यानगर / भगवान गायकवाड,
नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीवर भव्य स्मारक उभारावे तसेच त्याचे व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, अशी ठाम मागणी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या संदर्भातील निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुजन समाजाचे महानायक, भारताचे शिल्पकार असून त्यांचे योगदान अतुलनीय आहे. देशातील मंदिरे, चर्च, मशिदी आणि गुरुद्वारे त्या-त्या धर्माच्या समाजाच्या ताब्यात आहेत; मात्र डॉ. आंबेडकर यांच्या जन्मभूमीचे व्यवस्थापन सरकारमार्फत होत आहे. त्यामुळे हे पवित्र स्थळ बहुजन समाजाच्या ताब्यात सोपवून भव्य स्मारक उभारले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे.बोधगया येथील महाबोधी विहारचे पूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे द्यावे. महू येथील डॉ. आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन भारतीय बौद्ध महासभेला द्यावे.नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीचे व्यवस्थापन बौद्ध महासभेला हस्तांतरित करावे.बौद्ध मंदिर कायदा (BTA) 1949 तात्काळ रद्द करावा.या निवेदनाला वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, भगवंत गायकवाड, राम गायकवाड, दीपक पाटोळे, माधवराव चाबुकस्वार, संतोष गायकवाड, दीपक गायकवाड, अविनाश राक्षे, संतोष जाधव, संजय डहाणे, राजेंद्र पाडळे, मोहन शिरसाट, रवींद्र कांबळे, बाळू कांबळे, लक्ष्मण माघाडे, विजय कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनीफ शेख, नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव, युवा शहराध्यक्ष योगेश गुंजाळ, प्रवीण ओरे, ॲड. विद्या जाधव, संकेत शिंदे, देविदास भालेराव, राजीव भिंगारदिवे, जे.डी. शिरसाठ, अजित कुऱ्हाडे, रियाज शेख, अविनाश उडमळे, विवेक कसबे, रवींद्र कांबळे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
नागपूरमध्ये डॉ. आंबेडकर जन्मभूमीवर भव्य स्मारक उभारणीची मागणी

