अमोल रोकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारनेर तालुका सरचिटणीस पदी
आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते निवडीचे पत्र
पारनेर/प्रतिनिधी :
खडकवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल रोकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या पारनेर तालुका सरचिटणीस पदी निवड झाली आहे. सामाजिक चळवळींमधील त्यांचे योगदान पाहता ही निवड पक्षाला बळ देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
अमोल रोकडे यांनी गेली अनेक वर्षे ग्रामीण विकास, शेतकरी हक्क, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षणासाठी कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली. निवडीचे पत्र पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय औटी, तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, युवक तालुका अध्यक्ष भास्कर उचाळे, महिला तालुकाध्यक्ष सुषमा रावडे, युवती तालुकाध्यक्षा अपर्णा खामकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा सुधामती कवाद, सुभाष सासवडे, प्रगतिशील शेतकरी विकास रोकडे उपस्थित होते.
आमदार दाते म्हणाले, रोकडेंच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष तालुक्यात अधिक मजबूत होईल. नवनिर्वाचित राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस अमोल रोकडे यांनी पक्षाच्या तत्त्वांनुसार तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचे आश्वासन दिले. या निवडीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, पारनेर तालुक्यात पक्षाची ताकद वाढेल, अशी अपेक्षा आहे.

