वासुंदे येथे सोमवारपासून जोगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव
सलग १० दिवस किर्तन सेवा व विविध धार्मिक कार्यक्रम
पारनेर/प्रतिनिधी :
वासुंदे येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात दरवर्षी साजरा होतो. वासुंदे येथील जोगेश्वरी माता मंदिर या ठिकाणी नवरात्र उत्सव काळात किर्तन भजन, जागर, प्रवचन अशा विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वैकुंठवासी ह भ प नाना महाराज वनकुटे यांच्या आशीर्वादाने व ह भ प डॉ. नारायण महाराज जाधव (आळंदी देवाच व कृष्णकृपांकित डॉ. ह भ प विकासानंद महाराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव सोहळा याही वर्षी 2025 नवरात्र उत्सवानिमित्ताने जोगेश्वरी माता मंदिर वाबळे वस्ती वासुंदे येथे होणार आहे यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार यांची कीर्तन सेवा होणार आहे यामध्ये सोमवार दि. 22 सप्टेंबर 2025 पासून या उत्सवाला सुरुवात होणार असून हा उत्सव गुरुवार दि. 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.
दररोज संध्याकाळी सात ते नऊ किर्तन यामध्ये ह भ प सत्यम महाराज हुलावळे (अकोला), ह भ प रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, ह भ प कबीर महाराज आत्तार (सांगली), ह भ प निलेश महाराज कोरडे (शिवनेरी), ह भ प विनोदाचार्य पांडुरंग महाराज उगले (परभणी) ह भ प माऊली महाराज कदम (मोठे माऊली) ह भ प किरण महाराज कुलकर्णी (वासुंदे) ह भ प नरहरी महाराज सांगळे (आळंदी) धर्मगुरू ह भ प अमृताश्रम स्वामी महाराज (बीड), ह भ प साधकहृदय डॉ. नारायण महाराज जाधव (आळंदी), यांची कीर्तन सेवा होणार आहे तसेच गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह भ प श्री मोहनानंद महाराज पुरंदावडेकर, (जुनोनी मठ पंढरपूर) यांची कालची कीर्तन सेवा होणार आहे. उत्सव काळात दररोज संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव पारनेर तालुक्यातून व परिसरातून देवीचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. असे जोगेश्वरी देवस्थानचे विश्वस्त व जोगेश्वरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन जालिंदर वाबळे यांनी माहिती देताना सांगितले आहे.

