पवळदरा पोखरी / प्रतिनिधी,
पवळदरा पोखरी येथील श्री गणपतीर बाबा घाट सुशोभीकरणाचा उद्घाटन समारंभ आज सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. गावातील व परिसरातील ग्रामस्थांनी घाट सुशोभीकरणासाठी सुजित झावरे पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार अवघ्या काही महिन्यांत निधी मंजूर करून कामाला सुरुवात झाली असून, आज या कामाचे उद्घाटन झाले.

यावेळी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन किसन धुमाळ, अमोल साळवे, संजय काशिद, शिवाजी रोकडे, संजय भोर, सतीश पवार, निजाम पटेल, आनंदा केदार, संतोषशेठ शेलार, अशोक पवार, बाळासाहेब शिंदे, संतोष गाढवे, तुकाराम पवार, कुंडलिक पवार, पोपट कसबे, पिंटू कोकाटे, साहेबराव करंजेकर, मुनावर सय्यद, अन्सार पटेल, बन्सी करंजेकर, बंटी आहेर, हसन मोमिन, भाऊसाहेब चौधरी, गाडेकर दादा, रामदास पवार, अनिल शिंदे, अशोक आहेर, संजय ठुबे, तुकाराम मधे, पांडू केदार, राजू केदार, सुभाष पवार, भाना केदार, बाळासाहेब मधे, सोयल मोमिन, विक्रम पवार, ठेकेदार नागेश रोहोकले यांच्यासह गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घाट सुशोभीकरणामुळे परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार असून, ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचे आभार मानले.