उद्योजक बजरंग गागरे यांच्या वाढदिवसानिमित्त कॅम्प व आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर
खडकवाडी येथील ग्रामस्थांनी घेतला उपक्रमाचा लाभ
पारनेर/प्रतिनिधी :
सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक बजरंग गागरे यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश लंके प्रतिष्ठान व रवींद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवाडी येथे विशेष सेवा कॅम्प आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात गावातील व परिसरातील नागरिकांसाठी विविध सेवांचा लाभ देण्यात आला.
विशेष सेवा कॅम्पमध्ये नवीन रेशन कार्ड काढणे, नाव दुरुस्ती, नाव कमी करणे, नवीन मतदार नोंदणी, बांधकाम कामगार कार्ड, आणि रेशन कार्ड ऑनलाइन करणे यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच, मोफत आरोग्य शिबिरात सर्व रोगांचे निदान आणि उपचार करण्यात आले. तसेच या शिबिरामध्ये रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते या शिबिराला खडकवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने लाभ घेतला.
यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव, खडकवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत उर्फ बजरंग गागरे, श्रीरंग रोकडे, प्रवीण भन्साळी डॉ. बाळासाहेब कावरे सामजिक कार्यकर्ते राजेंद्र रोकडे, विष्णु शिंदे, विठ्ठल शिंदे, संतोष शिंदे, सुभाष ढोकळे, युवा नेते विशाल गागरे, गणेश आग्रे, संतोष शिंदे, बाळासाहेब शिंगोटे, डॉ. रावसाहेब आग्रे, नवनाथ बिचारे शिवाजी शिंगोटे बाबासाहेब सागर शंकरराव नवले एल आर शिंदे विलास गागरे कैलास आग्रे निलेश अग्रे शरद गागरे, पंकज स्वामी, निलेश गागरे, प्रदीप ढोकळे, भाऊसाहेब शिंगोटे, दिनकर ढोकळे, आबासाहेब नवले, भागचंद्र हुलावळे, खंडू ढोकळे, देवराम नवले, राजू ढोकळे, राजू नवले, बबन ढोकळे, सोमनाथ गागरे, सतिष हुलावळे, चेतन गागरे, संतोष बर्डे, गोरख चिकणे, दावजीराम वाबळे, संदीप शिंदे मेजर विश्वनाथ ढोकळे, अण्णासाहेब गागरे, विठ्ठल चि. नवले, दत्तात्रय नवले, विठ्ठल हुलावळे, ऋतिक गागरे, माचो मधे, संपत जाधव, सुयोग गागरे, शाहीर बोबडे, संजय इघे, जनार्धन बोबडे, पांडुरंग गागरे, गणेश गागरे, रवींद्र गागरे, रवींद्र ढोकळे, गोरक्ष ढोकळे, गोरक्ष गायकवाड, अशोक बर्डे, विलास गायकवाड, सुकर गायकवाड, भास्कर बर्डे, आदी उपस्थित होते.
बजरंग गागरे मित्र मंडळाने या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. खासदार निलेश लंके यांनी या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामस्थांच्या कल्याणासाठी अशा उपक्रमांचे सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाने गावकऱ्यांमध्ये आनंद आणि समाधानाचा वातावरण निर्माण झाला.
…

