पारनेर शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सवात पाचवे पुष्प
पारनेर / भगवान गायकवाड,
नवरात्र सण हा शारिरिक, मानसिक आणि अध्यात्मिक शक्ती वाढवण्याचा काळ असतो.तसेच देवी दुर्गा दुर्गुणां वर विजयाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राच्या समन्वयक ब्रह्माकुमारी साधना दिदी यांनी केले त्या पारनेर शहरातील लोणी रोड मधील सार्वजनिक नवरात्र उत्सवात पाचवे पुष्प गुंफताना मार्गदर्शन करत होत्या. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उषा खोसे, जयश्री औटी डॉ.रंगनाथ आहेर सर, मंडळाचे विश्वस्त राजु खोसे, संभाजी मगर, जमदडे सर आणि सोसायटी मधील भाविक भक्त आदी मान्यवर उपस्थित होते.
सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२५ लोणी रोड येथील खोसे परिवार व सोसायटी येथे धार्मिक कार्यक्रमा मध्ये प्रवचनरूपी सेवा देताना ब्रह्माकुमारी साधना दिदी म्हणाल्या की, आपली भारतीय संस्कृती हि आध्यात्मिक संस्कृती आहे. म्हणून आपण सर्वजण सगळे सणवार खूप प्रेमाने व श्रद्धेने साजरे करत असतो.या सणामध्ये श्रद्धा, भावना, नियम व संयमाने करतात. नवरात्रास प्रारंभ झाला की घराघरात नव चैतन्य निर्माण होते. प्रत्येकाचे अंतःकरण शुद्ध, स्वच्छ व पवित्र होते. आपल्याकडे चैत्र नवरात्र व शारदेय नवरात्र करतात. परंतु घटस्थापना करण्याच्या आधी आपण सर्व घर स्वच्छ करतो. व मग देवीचे आवाहन, सर्व प्रथम स्वच्छ माती ठेवून कलश पूजन करून त्यावर स्वस्तिका काढली जाते. परंतु याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की तेच आपणाला माहीत नाही. ती माती म्हणजे हे विनाशी शरीर कलश म्हणजे बुद्धी रूपी घडा आहे .स्वस्तिका म्हणजे या सृष्टीरूपी नाटकामध्ये चार युगा मध्ये काय कर्म करतो तसा कर्माचा भाग आहे. शिव परमात्मा जेव्हा या धर्तीवर येतात तेव्हा आपल्या बुद्धीला द्यान अमृतानी भरतात. नऊ दिवस आपण उपवास करतो शुद्ध अन्न पोटात जाते म्हणून म्हणतात की जसे अन्न तसे मन.. शुद्ध भोजन मन, बुद्धी व संस्काराला पण परीवर्तन करून टाकते. नऊ दिवस दिवा लावला जातो. तर द्यान प्रकाशानी कुठलेही पाप कर्म होत नाही. व पुण्य जमा होते. व रोज घटाची माळ बदलतात म्हणजे नऊ दिवसात आपल्या मनातील नकारात्मक विचार व ईर्षा, द्वेष, अपशब्द बोलणे आपोआप बंद होते. या पवित्र वातावरणामुळे मनाचे पण परीवर्तन घडून आणते. मनामध्ये अनेक विचार होऊन गेलेल्या घटना परिस्थितीची मोठी यादी करून ठेवली आहे. परंतु जेवढी घराची स्वच्छता करतो तेवढी मनाची करतो का? तर उत्तर येईल नाही मन स्वच्छ करण्यासाठी काही घटना तर परिस्थिती विसरण्यासाठी एक तर माफ करा व माफी मागा! नवरात्र मध्ये कुणी कुणी पायात चप्पल घालत नाही याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की दिवसभर आपण मी व माझे करत राहतो. ज्या घटामध्ये जे सात प्रकारचे कडधान्य टाकले जाते.याचा अर्थ असा आहे की आपण सर्वात सात गुण आहेत.ते म्हणजे सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान, शक्ती हे सात गुण जागृत करणे व दुसऱ्या दिवशी जेव्हा सीमोलंघन करण्यासाठी जेव्हा जातात तेव्हा अवगुण वेशी बाहेर सोडणे व घरी येताना हे दैवी गुण घेऊन येणे व आपट्याचे पान सोन म्हणून जेव्हा देतो तेव्हा खरे सोने म्हणजे एकमेकांना गुणांचे दान करणे होय,शरीर विनाशी आहे. वस्तू, वैभव विनाशी आहे. हे सर्व कळत असतानाही मनुष्य सदैव पैसा.. पैसा करत राहतो. जे नश्वर आहे. त्याच्या मागे आपण धावत आहोत. जे सत्य आहे शाश्वत आहे जे या जन्मतही व पुढच्या जन्मतही सोबत येईल अशी काही पुण्य संचित जमा केले तर वर्तमान पण भविष्यात पण सोबत जाईल. चला तर या नवरात्रीत असे व्रत घेऊ की अनेक जन्माची कमाई जमा होईल.
सूत्रसंचालन उषा खोसे यांनी केले तर आभार ईश्वरीय परिवाराने मानले.
नवरात्र सण हा ऊर्जा जागृत करण्याचा आणि अध्यात्मिक शक्ती वाढवण्याचा काळ – ब्रह्माकुमारी साधना दिदी

