धोत्रे बुद्रुक येथे शारदीय नवरात्री उत्सव प्रवचन
पारनेर / भगवान गायकवाड,
नवरात्री हा देवीचा उत्सव आहे या नऊ दिवसात भाविक भक्त उपवास करत असतात हि एक परंपरा नाही तर एक गूढ आध्यात्मिक विज्ञान आहे. नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे साधना, भक्ती, आणि आत्मशुद्धीचे दिवस असतात .असे प्रतिपादन प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालय, टाकळी ढोकेश्वर केंद्राच्या समन्वयक ब्रह्माकुमारी उज्वला दिदी यांनी केले ते पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक येथील शारदीय नवरात्री उत्सवात प्रवचन रूपी सेवा देताना बोलत होत्या यावेळी भाविक भक्त बाळासाहेब लक्ष्मण भांड, मगन गणपत हरेल, शेंडगे मेजर, राजू नारायण तागड, विजय सासवडे, दिपक सासवडे, देव बाई भांड, अलकाबाई फाटक आदी मान्यवर उपस्थित होते
टाकळी ढोकेश्वर केंद्राच्या समन्वयक ब्रह्माकुमारी उज्वला दिदी भाविक भक्तांना प्रवचन रूपी सेवा देताना म्हणाल्या की,उपवास करणे म्हणजे फक्त अन्न टाळण नाही तर मन, वाणी आणि शरीर शुद्ध करण. जेव्हा आपण तळलेली पदार्थ, कांदा, लसूण मसाले या पासून दूर राहतो तेव्हा आपल्या शरीरात सात्विकता वाढते. या नऊ दिवसात उपवास केल्याने नकारात्मक विचार कमी होतात आणि मन देवीच्या भक्तीत रमते. आयुर्वेदा नुसार उपवास शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढतो आणि आपली शरीराची पचनशक्ती सुधारते . सूत्रसंचालन बाळासाहेब भांड यांनी केले तर आभार ईश्वरीय परिवाराने मानले.
नऊ दिवस उपवास म्हणजे साधना, भक्ती आणि आत्मशुद्धीचे दिवस – ब्रह्माकुमारी उज्वला दिदी

